'धुरंधर २' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या रिलीज डेटमुळे अनेक सिनेमांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यशचा 'टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परंतु आता 'टॉक्सिक'मुळे वरुण धवनच्या एका आगामी सिनेमाला मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर
डेव्हिड धवन दिग्दर्शित आगामी रोमँटिक फिल्म 'है जवानी तो इश्क होना है' जूनमध्ये रिलीज होणार होती. परंतु आता टॉक्सिकमुळे 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'टॉक्सिक'सोबत वाद टाळण्यासाठी वरुण धवनने आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आधी हा सिनेमा ५ जूनला रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा १२ जूनला रिलीज होणार आहे.
Web Summary : Yash's 'Toxic' impacts Bollywood! Varun Dhawan's 'Hai Jawani Toh Ishq Hona Hai' release shifts from June 5th to June 12th, avoiding clash. The film stars Varun Dhawan, Mrunal Thakur and Pooja Hegde.
Web Summary : यश की 'टॉक्सिक' का बॉलीवुड पर असर! वरुण धवन की 'है जवानी तो इश्क होना है' की रिलीज 5 जून से 12 जून तक खिसकी, टकराव टाला। फिल्म में वरुण धवन, मृणाल ठाकुर और पूजा हेगड़े हैं।