Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्लास्टिक दीदी' म्हणत नेटीझन्सने उडवतात तिची खिल्ली, ट्रोल होण्यामागे 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 06:00 IST

मौनी रॉय आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

मौनी रॉय टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या जबरदस्त अभिनयाशिवाय बोल्ड फॅशन स्टाईलमुळेही  ती लोकप्रिय आहे. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  मौनी नेहमीच सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात  यशस्वी ठरते.

तसेच अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोलही केले जाते. मात्र या गोष्टींनी मौनीलाही काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले होते. जेव्हा मौनी घराबाहेर पडते तेव्हा तिचे स्टाईल स्टेटमेंटही तिच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरते. मात्र कधीकधी जास्त स्टायलिश दिसण्याच्या नादात ती नेटीझन्सचे लक्ष वेधून घेते आणि ट्रोल होते.  

'इंग्लिश मीडियम' सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यानही मौनीचा ड्रेसिंग अंदाज पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. मौनीने परिधान केलेल्या ड्रेसची तुलना थेट चीनी फॅशन म्हणून करण्यात आली होती. यावेळी मौनीने परिधान केलेला मोनोटोन अटायर इतका आकर्षक नसला, तरी यात मौनी ठिकठाक दिसत होती. चेह-यावरही तिने सॉफ्ट न्यूड मेकअप केला होता. मात्र तिचा हाच अंदाज तिच्याच चाहत्यांना काही रूचला नव्हता.

मौनीने रॉयने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती करिअरची सुरुवात

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली सुरुवात मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले. मौनीच्या चाहत्यांना वाट तिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली मात्र असे नाही आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावल्याचा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती. 

छोटा पडदा ते थेट बॉलिवूड असे आहे तिचे फिल्मी करिअर

एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत दिसली होती. यात तिने कृष्णा तुलसीची भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड आवडली होती. यानंतर मौनीने 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :मौनी राॅय