Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर! ‘रईस’ ची शूटिंग संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 10:56 IST

‘फॅन’ रिलीज व्हायला केवळ ९ दिवस बाकी असताना शाहरूख खान त्याच्या ‘ईद’ ला रिलीज होणाºया ‘रईस’ चित्रपटाची शूटिंग करण्यात ...

‘फॅन’ रिलीज व्हायला केवळ ९ दिवस बाकी असताना शाहरूख खान त्याच्या ‘ईद’ ला रिलीज होणाºया ‘रईस’ चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त होता. फॅन आणि रईस मध्ये त्याची कित्येक दिवसांपासून धावपळ सुरू होती.पण आता अखेर रईसची शूटिंग संपली असल्याचे कळाले आहे. त्याला आता थोडा तरी सुटकेचा नि:श्वास टाकता येईल एवढेच. शाहरूखने टिवटरवर पोस्ट केले आहे की,‘ फिनिश रईस. मेबी अ बिट आॅफ पॅचवर्क लेफ्ट इफ एनी.विल मिस द लाफ्स...द इंटेसिंटी. थॅक्स टू द स्विटेस्ट युनिट एव्हर. लव्ह यू.’ रईसची शूटिंग संपल्याने आता शाहरूखला फॅनच्या प्रमोशनसाठी पूर्ण वेळ देता येऊ शकतो. तसेच पुढे त्याचा रईसही आहेच. त्याचीही चाहते वाट पाहत आहेतच.