Join us

​अखेर खरी ठरली सौंदर्याच्या घटस्फोटाची बातमी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 21:32 IST

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या हिच्या घटस्फोटाची बातमी अखेर खरी ठरली. खुद्द सौंदर्यानेच twitterवर याची घोषणा केली. ...

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या हिच्या घटस्फोटाची बातमी अखेर खरी ठरली. खुद्द सौंदर्यानेच twitterवर याची घोषणा केली.  सौंदर्या व तिचा पती अश्विन रामकुमार यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्याची चर्चा सध्या मीडियात सुरु होती. सौंदर्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचीही माहिती होती. सौंदर्याने या वृत्ताला आज दुजोरा दिला.  ‘माझ्या लग्नाबाबत सुरु असलेली चर्चा खरी आहे. आम्ही दोघे गत वर्षभरापासून वेगळे राहत आहोत आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. यास्थितीत माझ्या खासगी आयुष्याचा सन्मान व्हावा, अशी माझी विनंती आहे,’असे tweet सौंदर्याने केले आहे. पेशाने ग्राफिक डिझाईनर आणि चित्रपट निर्माती सौंदर्याच्या या tweetने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सौंदर्या व  अश्विन २०१० मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठीत अडकले होते. या दांम्पत्याचा एक वर्षाचा मुलगाही आहे.