BJP workers cleaning and purifying the stage ..from where I spoke in Sirsi town ...by sprinkling cow urine (divine gomoothra)...
अभिनेता प्रकाश राजच्या कार्यक्रमानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी गोमुत्राने धुवून काढले स्टेज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:31 IST
सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री बघावयास मिळत आहे. आता तर भाजपा कार्यकर्त्यांनी असे काही ...
अभिनेता प्रकाश राजच्या कार्यक्रमानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी गोमुत्राने धुवून काढले स्टेज!
सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री बघावयास मिळत आहे. आता तर भाजपा कार्यकर्त्यांनी असे काही केले, ज्यामुळे प्रकाश राजविषयी भाजपाच्या मनात असलेला द्वेष उफाळून आला. त्याचे झाले असे की, प्रकाश राज यांचा कार्यक्रम संपताच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क संपूर्ण स्टेज गोमुत्राने धुवून काढले. याबाबतची माहिती स्वत: प्रकाश राज यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली. कर्नाटकमधील राघवेंद्र मठ याठिकाणी प्रकाश राजचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्यांनी उत्तर कन्नड मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीयमंत्री अनंत हेगडे यांच्यावर टीका केली. मात्र ही टीका भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या फारशी पचनी पडली नाही. त्यांनी चक्क मकरसंक्रांतीच्या दिवशीच गोमुत्राने संपूर्ण स्टेजची साफसफाई केली. यावेळी प्रकाश राज यांनी कन्नड वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमीही त्यांच्या ट्विटसह शेअर केली. त्याचबरोबर त्यांनी, ‘ज्याठिकाणी माझा कार्यक्रम होईल त्याठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते स्वच्छता करणार काय?’ असा प्रश्नही उपस्थित केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशाल मराठेच्या नेतृत्त्वात हे ‘सफाई’ अभियान राबविण्यात आले. मराठेने मीडियाशी बोलताना म्हटले की, ज्या स्टेजवर प्रकाश राज यांनी भाषण दिले त्या स्टेजसह संपूर्ण कार्यक्रम स्थळाला गोमुत्राने शुद्ध करण्यात आले आहे. अशा स्वयंघोषित बुद्धिजिवीने आमचे धार्मिक प्रतिष्ठान अशुद्ध केल्यानेच आम्ही अशाप्रकारची मोहीम राबविली. हिंदू देवीदेवतांचा अपमान करणारे आणि बीफ खाण्यास प्रोत्साहन देणारे असे लोक याठिकाणी येत असल्याने आम्ही स्वत:ला अशुद्ध मानतो. समाज या डाव्या विचारसरणीच्या आणि असामाजिक तत्त्वांची बेभान बतावणी करणाºया लोकांना कधीच माफ करणार नाही. दरम्यान, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी दक्षिणपंथी विचारधारा आणि भाजपाविरोधात उघडपणे आपली भूमिका मांडली होती. त्याचबरोबर त्यांनी बºयाचदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वक्तव्य केले आहेत. त्यामुळेच भाजपा कार्यकर्ते त्यांचा आता जाहीरपणे विरोध करताना बघावयास मिळत आहेत.