४२ महिन्यानंतर संजय दत्त सुटला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:23 IST
१९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्फस्फोटादरम्यान अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरूंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त अखेर ४२ महिन्यांनंतर येरवडा तुरूंगातुन सुटला.
४२ महिन्यानंतर संजय दत्त सुटला !
१९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्फस्फोटादरम्यान अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरूंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त अखेर ४२ महिन्यांनंतर येरवडा तुरूंगातुन सुटला. चार्टर्ड विमानाने मुंबईत तो दाखल होईल. त्याच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मुंबईत आल्यानंतर सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यानंतर तो आई कै.नर्गिस दत्त यांच्या मरिन लाईन्स येथील ग्रेव्हयार्ड येथे जाणार आहे. तीन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या संजयची आठ महिने अगोदरच तुरूंगातून सुटका होणार असून या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेतून संजयला शिक्षेत देण्यात आलेली आठ महिन्यांची सूट रद्द करण्यात यावी, असे जाहीर करण्यात आले. घटनाक्रम :१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६ मे २०१३ रोजी संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्वाेच्च न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यापैकी त्याने खटल्यादरम्यान दीड वर्षांची शिक्षा आधीच भोगली होती. त्यामुळे त्याला मे २०१३ पासून साडेतील वर्षांची शिक्षा पूर्ण करायची होती. ही शिक्षा आॅक्टोबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र त्याआधीच संजय दत्तची कारागृहातून सुटका झाली.त्रिशालाचा क्यूट मॅसेज :बाबा संजय दत्त केव्हा सुटतात याची प्रतीक्षा त्याची मुलगी त्रिशाला दत्त हिलाही लागली होती. तिने काल इन्स्टाग्रामवर एक क्यूट मॅसेज बाबा संजय दत्त साठी पोस्ट केला होता. ‘आय अॅम सो एक्साईटेड अॅण्ड थ्रिल फॉर यू, आय लव्ह यू, अॅण्ड आय कान्ट वेट टू सी यू!’