Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर तीनच महिन्यांत गौहर खान प्रेग्नंट? चाहत्यांना प्रश्न पडला अन् अचानक कहाणीत ‘ट्विस्ट’ आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:42 IST

गौहरचा पती जैदने एक व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओनंतरच गौहर प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. पण...

ठळक मुद्देजैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.

बॉलिवूड व टीव्ही अभिनेत्री गौहर खानने तीन महिन्यांपूर्वी स्वत:पेक्षा 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफर जैद दरबारशी लग्न केले होते आणि  आता  काय तर लग्नानंतर तीनच महिन्यांनी गौहर प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झालीये. खरे तर गौहरचा पती जैदने एक व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओनंतरच गौहर प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. पण या प्रेग्नंसीच्या कहाणीत अचानक ट्विस्ट आला.

या व्हिडीओच्या सुरुवातीला ‘कोई आ रहा है,’ असे जैद म्हणतो आणि यानंतर त्याच्या फॅमिली मेंबर्सची शॉकिंग रिअ‍ॅक्शन येते.  ‘हे कन्फर्म आहे. आमच्यासोबत एक नवा अतरंगज जोडला जाणार आहे. सर्वांच्या शॉकिंग रिअ‍ॅक्शन पाहून काय वाटतेय? कोण असू शकतं?  कमेंटमध्ये सांगा,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना जैदने लिहिले. साहजिकच त्याच्या या व्हिडीओनंतर गौहर प्रेग्नंट तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला. काही चाहत्यांनी तर अगदी छातीठोकपणे गौहर प्रेग्नंट आहे, तुम्हाला बेबी होणार आहे, अशा कमेंट्स करत गौहर व जैदला शुभेच्छा देणे सुरु केले.

पण आधी म्हटल्याप्रमाणे ‘कहानी में ट्विस्ट’ आहे. त्यानुसार, काही तासानंतर स्वत: जैदनेच याचा खुलासा केला आणि जैद व गौहरच्या घरी आलेला हा नवा पाहुणा कोण, हे लोकांना कळले. होय, तर गौहर व जैदच्या घरी एक कुत्रा आला. आमच्या घरातील नवा सदस्य म्हणून जैदने या कुत्र्याचा फोटो शेअर केला.

जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.तो म्युझिक व्हिडीओ छमियामध्ये शक्ती मोहन आणि वेस्ट इंडीजचा क्रिेकेटर ड्वेन ब्राओसोबत दिसला होता.   

टॅग्स :गौहर खान