‘उडता पंजाब’ वादाचा ‘हाऊसफुल’ला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:48 IST
उडता पंजाब येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्ड आणि अनुराग कश्यप यांच्या वादात चित्रपटाच्या प्रदर्शनाची ...
‘उडता पंजाब’ वादाचा ‘हाऊसफुल’ला फायदा
उडता पंजाब येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्ड आणि अनुराग कश्यप यांच्या वादात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेल्यास त्याचा हाऊसफुल-३ ला नक्कीच फायदा होईल, असे अक्षय कुमारने सांगितले.मी पहलाज निहलानी यांच्यासोबत ‘सेटींग’ केले आहे, असे चंकी पांडे याने गमतीत म्हटले. या चित्रपटाच्या नावातून पंजाब हा शब्द वगळावा असे सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी यांनी सांगितले आहे. येत्या काही महिन्यातच पंजाबमध्ये निवडणूक होणार असून, राज्यातील ड्रगची समस्या हा चित्रपटाचा विषय आहे. पहलाज निहलानी यांच्याविषयी काही तरी बोल असे म्हटल्यावर अक्षय म्हणाला, ‘याविषयी चंकी पांडे साहेब अधिक काही बोलू शकतील. त्यांचे पहलाज निहलानी यांच्यासमवेत चांगले संबंध आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘आग ही आग’ं हा पहलाज निहलानी यांनी तयार केला होता.’