Join us

...​तर कंगना असती अ‍ॅडल्ट चित्रपटांची नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:15 IST

बॉलिवूडची क्विन अशी बिरुदावली मिरवणारी कंगना रानौत हिने अभिनयाच्या बळावर रुपेरी दुनियेत आपले स्थान निर्माण केल आहे. कंगना रानौत ...

बॉलिवूडची क्विन अशी बिरुदावली मिरवणारी कंगना रानौत हिने अभिनयाच्या बळावर रुपेरी दुनियेत आपले स्थान निर्माण केल आहे. कंगना रानौत आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे, मात्र संघर्षाच्या काळात निराश झालेल्या कंगानाने अ‍ॅडल्ट चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला असता असे मत व्यक्त क रीत पुन्हा एकदा खळबळ माजविली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रानौतने २००६ साली महेश भट्ट यांच्या गँगस्टर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाने धक्कादायक खुलासा केला आहे. कंगना म्हणाली, जर मला गँगस्टर या चित्रपटाची आॅफर आली नसती तर मी अ‍ॅडल्ट चित्रपट केला असता. ‘गँगस्टर’ची आॅफर येण्यापूर्वी एका अ‍ॅडल्ट चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी बॉलिवूडमध्ये संघर्ष करीत होते. माझ्याकडे काम नव्हते. त्यामुळे मी त्यास नकार देऊ शकली नाही. मी त्यांना होकार कळविला. तो चित्रपट माझ्यासाठी योग्य नव्हता. या चित्रपटासाठी मी फोटोशूट केले होते. यासाठी माझे अत्यंत सैल कपड्यात फोटो घेण्यात आले. आतमध्ये अंर्तवस्त्रे घालायला दिलीच नव्हती. ते एका ब्लू फिल्मप्रमाणे वाटत होते. मला वाईट वाटत होते. यानंतर मला ‘गॅँगस्टर’या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली. मी लगेच होकार दिला. यामुळे त्या चित्रपटाचे निर्माते माझ्यावर जाम चिडले होते. त्यावेळी मी १७ -१८ वर्षांची असेल. मला काही काळासाठी यामुळे कायदेशीर अडचणीमचा सामना करावा लागला, असेही कंगना म्हणाली. ‘गँगस्टर’ हा चित्रपट मिळाला नसता तर मी तो अ‍ॅडल्ट चित्रपट केलाच असता. कदाचित याच मुळे मी माझ्याकडे आलेल्या प्रत्येक चित्रपटाला होकार देते. मला पुन्हा अशा परिस्थीतचा सामना करावा लागू नये असे मला वाटते असेही कंगना म्हणाली. कंगना रानौतचा आगामी चित्रपट ‘रंगून’ लवकरच प्रदर्शित होत असून यात सैफ अली खान व शाहिद कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाची कथा द्वितीय विश्वयुद्धाच्या पाश्वभूमीवर आधारित आहे. याशिवाय तिचा हंसल मेहता यांच्या आगामी सिमरन या चित्रपटात दिसणार आहे. यात अमेरिकेतील एक बँक लुटण्याचा प्लॉन करतान दिसणार आहे.