Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदूर गोपालकृष्णन चिडले: केंद्र सरकारचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विनाशकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 18:52 IST

राष्टÑीय चित्रपट पुरस्कार विजेते अदूर गोपालकृष्णन यांच्या अनुसार चित्रपटांच्या प्रति केंद्र शासनाचे धोरण हे विनाशकारी आहे. गोपालकृष्णन यांच्या अनुसार ...

राष्टÑीय चित्रपट पुरस्कार विजेते अदूर गोपालकृष्णन यांच्या अनुसार चित्रपटांच्या प्रति केंद्र शासनाचे धोरण हे विनाशकारी आहे. गोपालकृष्णन यांच्या अनुसार चित्रपटाचे धोरण विनाशकारी आणि सहकार्याचे नाही. आमच्या कार्याला नष्ट केल्यानंतर या केंद्र सरकारच्या अधिकाºयांच्या चेहºयावर मी आनंद पाहिल्याचे त्यांनी उद्वेगाने सांगितले. केरळमधील चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन हे नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे आयोजित गेटवे लिटफेस्ट येथे ‘बॉलिवूड म्हणजे भारतीय सिनेमा नव्हे’ या विषयावर बोलत होते.्नगोपालकृष्णन म्हणाले, ते एकदा परदेशात विमानतळावर गेले असता, तेथील अधिकाºयांना लक्षात आले की ते चित्रपटाशी संबंधित आहेत. त्यावर त्या अधिकाºयाने विचारले, तुम्ही बॉलिवूडशी संबंधित आहात का? यावर गोपालकृष्णन यांनी नाही असे सांगितले. स्लमडॉग मिलेनिअर हा पक्का बॉलिवूड चित्रपट आहे, जो हॉलिवूडमध्ये निर्माण झालाय, असेही त्यांनी सांगितले.ज्यावेळी बाहुबली चित्रपटास राष्टÑीय पुरस्कार देण्यात आला, याचा संदेश वाईट अर्थाने गेल्याचीही टीका गोपालकृष्णन यांनी केली.त्यांच्या अनुसार क्षेत्रीय भाषेच्या श्रेणीत ‘दूरदर्शन’वर विभिन्न भाषेमधील चित्रपट दाखविण्यात येत होते. मी याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारचीच इच्छा नसल्याने ही परंपरा बंद झाली.अदूर गोपालकृष्णन यांच्या अनुसार लोकशाहीत सेन्सॉरशीप असणे चुकीचे आहे. केवळ हुकुमशाहीमध्येच अशा प्रकारचे नियम लादले जातात. मी कोणत्याही सेन्सॉरशीपवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही काय केले पाहिजे अथवा नाही, हे मी सांगू इच्छित नाही. लोकशाहीत हे अत्यंत मुर्खतापूर्ण आहे. असे प्रकार फक्त हुकुमशाहीतच होतात.’तुम्ही विचारांवर सेन्सॉरशीप लादत आहात. मात्र लोकशाहीत वेगवेगळ्या विचारांवर काम करतात. शाम बेनेगल, रमेश सिप्पी यांच्यासोबत त्यांनी सेन्सॉरशीपसंदर्भात चर्चा केली होती. समितीच्या अनेकांनी असे विचार बंद करण्याचे ठरविले होते. सिप्पी यांनी मात्र असे करू नये असे विचार मांडले.