भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' (operation sindoor) राबवलं. या ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवाद्यांची तळी बेचिराख करण्यात आली. मॉक ड्रील आणि ब्लॅकआऊट होणार अशी कल्पना देणाऱ्या भारताने थेट एअर स्ट्राईक केल्याने पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अशातच पाकिस्तानी आणि बॉलिवूड गायक अदनान सामीने (adnan sami) एक फोटो शेअर करुन पाकिस्तानची चांगलीच फिरकी घेतली आहे.
अदनान सामीने पाकिस्तानची उडवली खिल्ली
मूळचा पाकिस्तानचा असणारा बॉलिवूड गायक अदनान सामीने भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर एक खास मीम शेअर करत पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. अदनान सामीने शोले सिनेमातील जय आणि वीरुचा एक सीन शेअर केलाय. त्यावर लिहिलंय की, "७ मे को मॉक ड्रील रखते है". हा कॉमेडी मीम शेअर करत अदनानने एकही कॅप्शन लिहिता पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. अदनानने शेअर केलेला हा मीम चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताचं ऑपरेशन सिंदूर
भारताने आज रात्री पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चांगलाच बदला घेतला आहे. रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं. या यामध्ये जैश आणि हिजबुल सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय आणि लपण्याची ठिकाणे देखील समाविष्ट आहेत. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, काल रात्री हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीयांनी आणि जगभरातील देशांनी या हल्ल्याचं समर्थन करुन भारतीय सेनेचं अभिनंदन केलं आहे.