Join us

'अनुयुजुअल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:21 IST

'अनुयुजुअल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू कम बॅक फ्रॉम डेड''आशिकी' सिनेमानंतर अचानक लाईमलाईटपासून दूर गेलेल्या अनू अग्रवालचा ...

'अनुयुजुअल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू कम बॅक फ्रॉम डेड''आशिकी' सिनेमानंतर अचानक लाईमलाईटपासून दूर गेलेल्या अनू अग्रवालचा जीवन मरणाशी केलेला संघर्ष शब्दबद्ध असलेले पुस्तक म्हणजे 'अनुयुजुअल: मेमोइर ऑफ ए गर्ल हू कम बॅक फ्रॉम डेड' अनुच्या या आत्मचरित्राची खूप चर्चा झाली होती. अनू या पुस्तकात म्हणते की, मी त्या रात्री जवळजवळ मेलेच होते. ब्रीच कॅँडी हॉस्पीटलमधील लोक अजुनही असे मानतात की, मी जीवंत राहिले हा एक मोठा चमत्कारच आहे. त्यावेळी माझे शरीर ठिकठिकाणी जखमी झाले होते, डोक्यातुन रक्त वाहत होते, अंगात सर्वत्र सुया टोचत होत्या, शरीरभर टाके टाकून जखमा शिवण्यात आल्या आणि मला जीवनदान मिळाले.