Join us

‘ओके जानू’ मधील आदित्यचा लुक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 21:30 IST

‘फितूर’ मधील कॅटरिना कैफ सोबतचा पहिला चित्रपट म्हणून अभिनेता आदित्य रॉय कपूर प्रचंड चर्चेत आहे. त्यातील त्याचा लुक, अभिनय ...

‘फितूर’ मधील कॅटरिना कैफ सोबतचा पहिला चित्रपट म्हणून अभिनेता आदित्य रॉय कपूर प्रचंड चर्चेत आहे. त्यातील त्याचा लुक, अभिनय याची सध्या वाहवा सुरू आहे. ‘आशिकी २’ पासून प्रकाशात आलेला आदित्य आता एक नवा चित्रपट ‘ओके जानू’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट तमीळ ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मणी’ चा रिमेक आहे. दिग्दर्शक शाद अली यांच्या या चित्रपटात आशिकी २ को स्टार श्रद्धा कपूर त्याच्यासोबत असणार आहे. आदित्य नुकताच शाद अली ला भेटायला गेला असता दोघांनी थोडे फोटोसेशन केले. त्यातून आदित्यचा न्यू लूक लीक झाला आहे. त्या दोघांना पाहून वाटते की, त्यांनी उत्तम वेळ सोबत घालवला आणि महत्त्वाचे डिस्कशन त्यांचे झाले. आदित्यचा कूल अवतार आपले लक्ष आकर्षून घेतो.