Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्थ डे बॉय आदित्य रॉय कपूरची चाहत्यांना खास भेट, केली नव्या सिनेमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 12:22 IST

अभिनेता आदित्य रॉय कपूर याचा आज वाढदिवस. आज आदित्य 35 वा वाढदिवस साजरा करतोय.

ठळक मुद्देआदित्य सध्या एका मॉडेलला डेट करतोय. दिवा धवन असे तिचे नाव आहे.

अभिनेता आदित्य रॉय कपूर याचा आज वाढदिवस. आज आदित्य 35 वा वाढदिवस साजरा करतोय आणि आज वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. आदित्यचा हा आगामी सिनेमा दिग्दर्शक अहमद खान दिग्दर्शित करणार आहे. अहमद खानने याआधी बागी 2 व बागी 3 सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाचे नाव असेल, ‘ओम- द बॅटल विदईन’. पुढच्या महिन्यापासून या सिनेमाचे शूटींग सुरु होत आहे. 2021 मध्ये म्हणजे येत्या नव्या वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईन. 

आदित्यसोबत या सिनेमात दिशा पाटनी व तारा सुतारिया यांना कास्ट करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नुकताच आदित्य ‘लुडो’ या सिनेमात दिसला. डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज झाला. यात आदित्य व सान्या मल्होत्राची जोडी लोकांना चांगलीच आवडली दिसतेय. त्याआधी ‘मलंग’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला होता. यातील आदित्यच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते.

आदित्य रॉय कपूरने व्हीजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला व्हीजे म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. याचदरम्यान 2009 साली आदित्यने अजय देवगण व सलमानच्या ‘लंडन ड्रिम्स’ या सिनेमातून डेब्यू केला होता.  या चित्रपटातील त्याची भूमिका छोटीशी असली तरी या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्याने यानंतर अ‍ॅक्शन रिप्ले, गुजारिश यांसारख्या चित्रपटात काम केले. पण त्याला खº्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती ‘आशिकी 2’ या चित्रपटामुळे . त्याची या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. यानंतर त्याला एकही हिट चित्रपट देता आला नाही. 

या मॉडेलला करतोय डेट

आदित्य सध्या एका मॉडेलला डेट करतोय. दिवा धवन असे तिचे नाव आहे.आदित्य आणि दिवा यांच्या अफेअरची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. आदित्यने कधीच त्यांच्या नात्याचा मीडियात स्वीकार केला नाही. पण कॉफी विथ करण या कार्यक्रमात आदित्यला दिवाबद्दल विचारले असता त्याने सांगितले होते की, दिवा ही खूप चांगली मुलगी असून आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी एका फॅशन शोच्या दरम्यान आमची ओळख  झाली होती. आम्ही अनेकवेळा डिनरला देखील एकत्र गेलो आहोत. त्याचमुळे आम्ही डेट करत असल्याच्या चर्चांना ऊधाण आले होते. 

टॅग्स :आदित्य रॉय कपूर