Join us
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्ड चोरी केल्याचा रणवीरने आदित्यवर लावला होता आरोप, आता दिलं त्याने उत्तर...

By अमित इंगोले | Updated: October 27, 2020 14:25 IST

साधारण तीन वर्षाआधी रणवीर सिंहने आरोप लावला होता की, कॉलेजमध्ये आदित्य रॉय कपूरने त्याची गर्लफ्रेन्ड चोरी केली होती.

बॉलिवूडमधील लव्हस्टोरीज नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. बॉलिवूडमधील कलाकारांचं कधी ब्रेकअप चर्चेत असतं तर कधी पॅचअप. ब्रेकअप झालेले लोक दुसऱ्या व्यक्तीत प्रेम शोधतात. तर काही लोक लग्न करून मोकळे होतात. आज एकाची असलेली गर्लफ्रेन्ड उद्या दुसऱ्याचीही होते. असाच एक किस्सा काही वर्षांआधी समोर आला होता. आणि हा किस्सा आहे अभिनेता रणवीर सिंह आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील. यावर आता आदित्य रॉय कपूरची प्रतिक्रिया आली आहे.

साधारण तीन वर्षाआधी रणवीर सिंहने आरोप लावला होता की, कॉलेजमध्ये आदित्य रॉय कपूरने त्याची गर्लफ्रेन्ड चोरी केली होती. रणवीरने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सांगितले होते की, कॉलेजच्या दिवसात त्याचं त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप झालं होतं. आणि नंतर तिच आदित्य रॉय कपूरची गर्लफ्रेन्ड झाली होती. रणवीरच्या या आरोपावर आता आदित्य रॉय कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीरने आरोप लावला होता की, ज्युनिअर कॉलेजवेळी आदित्य सर्व मुलींचा चहेता होता. रणवीर केवळ एका मुलीवर प्रेम करत होता. पण त्या मुलीने ब्रेकअप केलं आणि ती आदित्यला डेट करू लागली होती. यावर बोलताना आदित्य रॉय कपूर मुंबई मिररसोबत बोलताना म्हणाला की, रणवीर सिंहने हे सगळं सांगतात जास्तच ड्रामेबाजी केली होती. आदित्य म्हणाला की, रणवीर आणि त्या मुलीच्या ब्रेकअपच्या अनेक महिन्यांनंतर त्याने तिला डेट करणं सुरू केलं होतं. 

तशी आता ही जुनी बाब झाली आहे. कारण २ वर्षाआधी रणवीर सिंहने अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत लग्न केलं. पण आदित्य रॉय कपूर कधीही त्याच्या रिलेशनशिपबाबत फार बोलत नाही. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं जातं. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, आदित्य सुपर मॉडल दीवा धवनला डेट करत आहे.  

टॅग्स :आदित्य रॉय कपूररणवीर सिंगबॉलिवूड