रणवीर सिंगची भूमिका असलेला 'धुरंधर' (Dhurandhar) आणि त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला सीक्वल 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटात 'यलीना जमाली' ही महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सारा अर्जुन (Sara Arjun) हिच्या अभिनयाचे आणि रणवीरसोबतच्या केमिस्ट्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, सारा अर्जुनला पहिल्यांदा पाहिल्यावर आदित्य धरची पहिली प्रतिक्रिया काय होती? याचा खुलासा झालाय.
हजारो मुलींमधून झाली निवड मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, यलीना या पात्रासाठी त्यांना असा चेहरा हवा होता जो प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन (Fresh Face) असेल. या भूमिकेसाठी जवळपास १००० हून अधिक मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनीही या भूमिकेसाठी रस दाखवला होता, मात्र दिग्दर्शक आदित्य धर यांना ही भूमिका वास्तववादी असणं अपेक्षित होतं.
मुकेश छाब्रा यांनी पाठवलेला साराचा ऑडिशन व्हिडिओ लगेच आदित्य धर यांना व्हॉट्सॲपवर पाठवला. तो व्हिडिओ पाहताच आदित्य धर थक्क झाले आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला, "कोण आहे ही?", साराचा अभिनय इतका नैसर्गिक होता की आदित्य धर यांना ती या भूमिकेसाठी योग्य वाटली. मुकेश यांनी त्यांना सांगितले की, तिने लहानपणी काही जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु मुख्य अभिनेत्री म्हणून ती एक फ्रेश चेहरा आहे.
मुकेश छाब्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला त्यांना वाटले होते की सारा ही रणवीर सिंहच्या तुलनेत लहान दिसेल का? कास्टिंगमध्ये अशा गोष्टी महत्वाच्या दिसतात. मात्र, चित्रपटाच्या कथेनुसार नायक एका दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या मुलीला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे तिथे साराचा निरागस चेहरा आणि तिचे व्यक्तिमत्व अगदी चपखल बसले.
साराने इतकी भारी ऑडिशन दिली होती की, मुकेश छाब्रा लवकरच तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. जेणेकरून प्रेक्षकांनाही समजेल की हजारो मुलींमधून तिचीच निवड का झाली. तू हिंदुस्तानी एजंट आहेस का? ही सिनेमातलीच स्क्रीप्ट साराला ऑडिशनसाठी देण्यात आली होती.
Web Summary : Aditya Dhar was stunned seeing Sara Arjun's audition for 'Dhurandhar 2'. He asked, "Who is she?" Impressed by her natural acting, he found her perfect for the role among thousands.
Web Summary : सारा अर्जुन का 'धुरंधर 2' के लिए ऑडिशन देखकर आदित्य धर दंग रह गए। उन्होंने पूछा, "यह कौन है?" उनके स्वाभाविक अभिनय से प्रभावित होकर, उन्होंने उसे हजारों में से भूमिका के लिए सही पाया।