Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी-कतरिनाने मुलाचं नाव ठेवताच 'धुरंधर'चा दिग्दर्शक झाला भावुक; म्हणाला "आयुष्याचं वर्तुळ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:28 IST

कतरिना-विकीच्या पोस्टवर दिग्दर्शक आदित्य धरची हृदयस्पर्शी कमेंट, भावुक होत म्हणाला...

Vicky Kaushal And Katrina Kaif’s Son's Vihaan Name : बॉलिवूडमधील सर्वात लाडकं जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अखेर आपल्या चिमुकल्याची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. कतरिनाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलाला जन्म दिला होता. बाळाला दोन महिने पुर्ण होताच काल या जोडप्याने मुलाचं नाव 'विहान' ठेवल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे,  'विहान' नावाचं विकीच्या 'उरी' चित्रपटाशी खास कनेक्शन जुळलं आलंय. 'उरी' चित्रपटामध्ये विकीनं साकारलेल्या पात्राचं नावही विहानच होतं. त्यामुळे चाहत्यांसह दिग्दर्शक आदित्य धर यांनीही या योगायोगावर "आयुष्याचं वर्तुळ पुर्ण झालं" म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

विकी कौशलला सुपरस्टार बनवणाऱ्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात विकीच्या पात्राचे नाव 'मेजर विहान शेरगिल' होते. आता विकीने आपल्या मुलाचे नावही 'विहान' ठेवल्याने चाहत्यांनी लगेचच हा संबंध जोडला. यावर प्रतिक्रिया देताना 'उरी'चा दिग्दर्शक आदित्य धर भावुक झाला.

आदित्य धरनं कतरिना आणि विकीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, "विकी आणि कतरिना, तुमचे खूप खूप अभिनंदन. माझ्या विक्कू, पडद्यावर 'मेजर विहान शेरगिल'ची भूमिका साकारण्यापासून ते आता छोट्या विहानला आपल्या कुशीत घेण्यापर्यंतचा हा प्रवास... खरोखरच आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. तुम्हा तिघांनाही माझे खूप प्रेम आणि आशीर्वाद! तुम्ही दोघेही नक्कीच उत्कृष्ट पालक ठरणार आहात" असं म्हणत त्यानं शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान, काल कतरिना आणि विकीने बाळाचा हात धरलेला एक गोंडस फोटो शेअर करत त्याचं नाव जाहीर केलं होतं.  "आमच्या आशेचा किरण, विहान कौशल. आमच्या प्रार्थनांना यश आलं.  आयुष्य खूप सुंदर आहे. विहानच्या जन्मानंतर आमचं जग क्षणार्धात बदललं. आभार मानायला शब्द अपुरे पडत आहेत". या पोस्टनंतर संपूर्ण बॉलिवूडमधून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

विहान नावाचा अर्थ काय?विहान हा संस्कृत शब्द आहे. या नावाचा अर्थ नवी सुरुवात असा होतो. कतरिना आणि विकीच्या लेकाचं हे नाव चाहत्यांनाही खूपच आवडलं आहे. आता छोट्या विहानचा चेहरा पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vicky-Katrina's son named Vihaan: 'Uri' director gets emotional, calls it life's circle.

Web Summary : Vicky Kaushal and Katrina Kaif revealed their son's name, Vihaan, connecting to Vicky's 'Uri' character. Director Aditya Dhar expressed joy, calling it a full-circle moment, showering blessings on the couple.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ