Join us

आदिती शिकतेय तमीळ भाषा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 15:36 IST

 आदिती राव हैदरी ही नेहमी विचारपूर्वक भूमिका निवडत असते. दिग्दर्शक, हिरो आणि एकं दरीतच टीम पाहून ती एखादा चित्रपट ...

 आदिती राव हैदरी ही नेहमी विचारपूर्वक भूमिका निवडत असते. दिग्दर्शक, हिरो आणि एकं दरीतच टीम पाहून ती एखादा चित्रपट साकारत असते. आता ती तमीळ चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार असून सध्या ती तमीळ भाषा शिकण्यावर लक्षकेंद्रित करणार आहे.मनी रत्नम यांचा हा चित्रपट असून ते तिला तमीळ शिकण्यासाठी मदत करत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, मनी रत्नम यांना वाटते की, आदितीने अगदी न अडखळता तमीळ भाषेत बोलावे. त्यासाठी ती गेल्या महिन्याभरापासून त्यावर काम करते आहे.ते तिला तमीळ भाषेचे उच्चारण शिकवत आहेत. तिच्या भूमिकेकडून त्याला योग्य प्रतिक्रिया हव्या आहेत. म्हणून तो स्वत: तिला भाषा शिकण्यासाठी मदत करतोय. वेल, दिग्दर्शक जर एवढं कलाकाराकडे लक्ष देत असेल तर भूमिका का चांगली होणार नाही?