Join us

राजघराण्यात जन्मलेल्या अदिती राव हैदरीचा असा सुरु झाला बॉलिवूड प्रवास, जाणून घ्या याखास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:41 IST

अदिती राव अवघ्या १७ वर्षांची असताना ती अभिनेता सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली.

बॉलिवूडच्या अनेक पिरियड चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी राजकन्यांची भूमिका साकारली आहे. त्यांचे चित्रपटांतील लूक पाहून असे वाटते की त्या खरोखरच राजघराण्यातील आहेत. पण आज आपण चित्रपटांबद्दल नाही तर खऱ्या राजकुमारीबद्दल बोलणार आहोत. हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीबद्दल. अदिती आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी...

अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 साली हैदराबादमधील एका शाही कुटुंबात झाला. अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. तसेच अदिती ही मोहम्मद सालेह अकबर हैदरा यांची भाची आहे. जे आसामचे माजी राज्यपाल राहिले आहेत. आदितीच्या आई आणि वडिलांचा प्रेमविवाह झाला होता, पण त्यांचंं लग्न फार काळ टिकला नाही. ती दोन वर्षांची होती जेव्हा तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि अभिनेत्रीने तिच्या आईसोबत राहणे पसंत केले.

आदितीने आपले शालेय शिक्षण आंध्रप्रदेशमध्ये पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिने भरतनाट्यमयचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रसिद्ध नृत्यागंणा लीला सैमसन यांची ती शिष्य आहे.अदितीची आई एक ठुमरी गायिका आहे.

अदिती राव अवघ्या १७ वर्षांची असताना ती अभिनेता सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली. चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. तेव्हा फक्त अदिती 21 वर्षांची होती. मात्र हे लग्न केवळ दोन वर्षांत मोडले.  2013 मध्ये अभिनेत्रीने यावर मौन सोडलं होते. एका मुलाखतीदरम्यान आदितीने खुलासा केला की, लग्नाच्या दोन वर्षानंतर ते आता वेगळे झाले.

वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम बहरलं आहे. अभिनेत्री गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता सिद्धार्थला डेट करत आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगून आहेत. 2021 मध्ये आलेल्या महा समुद्रम या चित्रपटातही दोघे एकत्र दिसले होते. या रोमँटिक चित्रपटातील दोघांची केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती. 

टॅग्स :आदिती राव हैदरी