Join us
Daily Top 2Weekly Top 5

Adipurush: ओम राऊतच्या कामावर भूषण कुमार खूश; गिफ्ट केली 4.2 कोटींची फेरारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 21:15 IST

Adipurush: T-Seriesचे मालक भूषण कुमारने 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतला फेरारी गाडी भेट दिली आहे.

Adipurush: कार्तिक आर्यननंतर T-Seriesचे मालक भूषण कुमारने 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतला महागडी फेरारी एफ8 ट्रीबुटो गाडी भेट दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, भूषण कुमारने गिफ्ट केलेल्या Ferrari F8 Tributo ची भारतात किंमत रु. 4.02 कोटी आहे. ओम राऊतने आदिपुरुषसाठी केलेल्या कामामुळे भूषण कुमार खूप आहेत. त्यामुळेच त्यांनी ही कार ओम राऊतला भेट दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार आधी फक्त भूषण वापरत होते. ही कार त्यांच्याच नावावर नोंदणीकृत होती. मात्र आता ती ओम राऊत यांच्या नावावर करण्यात आली आहे. 

कार्तिकला कार भेट दिलीभूषण कुमार यांच्याकडे कारचे चांगले कलेक्शन आहे. आदिपुरुषाला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी, भूषण ओमच्या कामावर खूप खूश आहेत. विशेष म्हणजे, भूषण कुमारने यापूर्वीही अनेकदा आपल्या आवडत्या सहकाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहेत. यापूर्वी, भूल भुलैया 2 च्या यशाने आनंदी झालेल्या भूषणने कार्तिक आर्यनला केशरी रंगाची मॅकलरेन जीटी भेट दिली होती. त्याची किंत 4.70 कोटी आहे. 

आदिपुरुष या दिवशी रिलीज होणारT-Series चा मेगा-बजेट चित्रपट 'आदिपुरुष' 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. साऊथ स्टार प्रभास या चित्रपटात रामच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेता सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :आदिपुरूषभुषण कुमार