Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय..." अभिनेत्री अदा शर्माने सांगितलं कारण; निर्मात्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:01 IST

अदा शर्माला नक्की काय अनुभव आला?

'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माकडे काम नसल्याचा तिने खुलासा केला आहे. गेल्या महिनाभरापासून ती घरी रिकामी बसली असून तिच्याकडे कोणतेही काम नाही. अदाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. एका निर्मात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि शूटिंगच्या सतत बदलणाऱ्या वेळापत्रकाचा (शेड्यूल) तिच्या इतर प्रोजेक्ट्सवर देखील परिणाम होत आहे.

अदा शर्मा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, " मी एकाच वेळी तीन प्रोजेक्ट्ससाठी कमिटमेंट दिली होती. मात्र, पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्याने तारखांबाबत वारंवार बदल केले आणि माझ्या मॅनेजरवर दबाव टाकला. इतकेच नाही तर त्या निर्मात्याने असभ्य वर्तणूक करत शिवीगाळही केली. जेव्हा इतर दोन चित्रपटांच्या दिग्दर्शकांना ही परिस्थिती समजली, तेव्हा त्यांनी सामंजस्य दाखवत आपल्या शूटिंगच्या तारखा बदलल्या, जेणेकरून माझे नुकसान होऊ नये. याचा अर्थ सगळेच लोक वाईट नाहीत तर काही चांगलेही आहेत."

ती पुढे म्हणाली, "मात्र शेवटी ज्या निर्मात्यासाठी मी इतर प्रोजेक्ट्सच्या तारखा बदलल्या, त्यानेच ऐनवेळी शूटिंग रद्द केले आणि आता त्या तारखांची गरज नसल्याचे सांगितले. यामुळे मी गेल्या एक महिन्यापासून 'वेल्ली' म्हणजेच रिकामी बसली आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे; मी भावनिक, मानसिक, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सध्या रिकामी आहे"

अशा शब्दांत तिने आपला संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे अदाचा 'वेल्ली' असा काही सिनेमा येणार आहे का असाही अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. कारण अदाने शेवटी सिनेमाची हिंट दिली आहे. मात्र इंडस्ट्रीत सगळेच वाईट नसतात, पण एका चुकीच्या अनुभवामुळे आपले मोठे नुकसान झाल्याचे ती म्हणते.  २०२३ मध्ये 'द केरळ स्टोरी' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अदाचे गेल्या काही काळातील 'बस्तर' आणि 'तुमको मेरी कसम' सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Adah Sharma alleges ruined career, blames producer's schedule changes.

Web Summary : 'The Kerala Story' actress Adah Sharma reveals being jobless due to a producer's erratic schedule changes impacting other projects. She faced unprofessional behavior and financial loss after a film's cancellation, leaving her emotionally and financially drained.
टॅग्स :अदा शर्माबॉलिवूड