Join us

अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:38 IST

आपल्या अनोख्या फॅशन सेन्सने ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आम्ही बोलतोय अदा शर्मा बद्दल. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे अदाचा जन्म 11 मे 1992 साली  झाला. अदा शर्मा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतील. आपल्या अनोख्या फॅशन सेन्सने ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे बरेचजण तिला इंडस्ट्रीची महिला रणवीर सिंग म्हणतात. 

अदाने बॉलिवूडमध्ये २००८ साली आलेल्या '१९२०' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती.

. हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान तिला आहे. 'कमांडो ३'मध्ये ही अदाच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहेत. यासिनेमात अदासोबत विद्युत, अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. 

टॅग्स :अदा शर्मारणवीर सिंग