Join us

​‘या’ अभिनेत्रीची मुलगी तान्या माधवानी सोशल मीडियावर ‘हिट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 13:31 IST

७० च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री मुमताज आठवतेयंं? तिला विसरणे शक्यचं नाही. आज मुमताज आठवण्याचे कारण म्हणजे, तिची मुलगी तान्या ...

७० च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री मुमताज आठवतेयंं? तिला विसरणे शक्यचं नाही. आज मुमताज आठवण्याचे कारण म्हणजे, तिची मुलगी तान्या माधवानी. होय, मुमताजची मुलगी तान्या सध्या इंटरनेटवर गाजतेय. बॉलिवूडच्या एकापेक्षा एक सुंदर ‘स्टार डॉटर्स’ला तान्या कडवी टक्कर देताना दिसतेय. अर्थात ग्लॅमर आणि हॉटनेसच्या बाबतीत. या दोन्ही गोष्टी तान्यात आहेत. पण या दोन्ही गोष्टीच्या भरवशावर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा मात्र तान्याचा कुठलाही इरादा नाही.तान्या तिची आई मुमताजच्या अतिशय जवळ आहे. आपल्या इन्स्टा अकाऊंटवर ती सर्रास फॅमिली फोटो शेअर करत असते. तान्या सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेयं. याठिकाणचे बिकनी फोटो तान्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तान्या कमालीची सुंदर दिसतेय.तिचे हे फोटो पाहून तान्याही बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करतेय, असे तुम्हाला वाटत असेल तर असे मात्र नाहीये. होय, बॉलिवूडमध्ये येण्याचा तान्याचा कुठलाही विचार नाही. तूर्तास ती तिच्या संसारात खूश आहे.ALSO READ : मुमताज यांना ओळखणेही झाले कठीण!होय, बोल्ड आणि तितकीच बिनधास्त तान्याने २०१५ मध्ये लग्न केले आणि ती संसारात रमली. लंडनमध्ये बॉयफ्रेन्ड मारकोसोबत ती लग्नबंधनात अडकली. तिचा एक मुलगाही आहे. तान्या सध्या आई मुमताज व कुटुंबासोबत लंडनमध्ये राहते.लग्नाआधी तान्याचे नाव उदय चोप्रासोबत जोडले गेले होते. हे दोघेही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. पण नंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले आणि तान्याच्या आयुष्यात मारकोची एन्ट्री घेतली. पुढे तान्याने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती गूपचूप मारकोसोबत विवाहबद्ध झाली. तान्याची मोठी बहीण नताशा अभिनेता फरदीन खान याची पत्नी आहे. दोघीही अनेकदा पार्टीत एकत्र दिसतात.