Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिस इंडिया राहिलेल्या ‘या’ अभिनेत्रीने बॉयफ्रेंडचे बेडवरील फोटो पाहताच तोडले त्याच्यासोबतचे नाते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 20:55 IST

अभिनेत्री तथा माजी मिस इंडिया पूजा चोपडा हिला त्यावेळी धक्का बसला जेव्हा तिने बॉयफ्रेंडचे काही फोटोज् बघितले. फोटोमध्ये पूजाचा ...

अभिनेत्री तथा माजी मिस इंडिया पूजा चोपडा हिला त्यावेळी धक्का बसला जेव्हा तिने बॉयफ्रेंडचे काही फोटोज् बघितले. फोटोमध्ये पूजाचा बॉयफ्रेंड त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत बेडवर दिसत होता. बॉयफ्रेंडचे अशा अवस्थेतील फोटो बघून पूजाने लगेचच त्याला कॉल केला अन् काही क्षणातच त्याच्यासोबतचे सर्व नाते तोडले. पूजाचा या बॉयफ्रेंडचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. परंतु इंडस्ट्रीमधील बºयाचशा कलाकारांशी त्याचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. या तरुणाने (नाव अद्याप समोर आले नाही) सुरुवातीला पूजाला इम्प्रेस करण्यास सुरुवात केली. पूजालादेखील त्याची कंपनी आवडू लागली. मात्र पूजाने लगेचच त्याला आपले सर्वस्व मानले नाही. सुरुवातीला तिने त्याच्यासोबत मैत्री करणे पसंत केले. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांना पसंत करीत होते. दोघांची लव्हस्टोरी पुढे जाणार तोच पूजाच्या हाती त्याचे काही फोटो लागले. ज्यामध्ये तो नशेत असून, एक्स गर्लफ्रेंडसोबत बेडवर दिसत आहे. हे फोटो बघताच पूजाला प्रचंड धक्का बसला. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याला कॉल केला. तसेच त्याच्यासोबतचे संपूर्ण नाते तुटल्याचेही ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे, पूजाला हे फोटो त्याच मुलीने पाठविले जिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड बेडवर दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्या तरुणीने पूजाला हे फोटो केवळ तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर सूड उगविण्याच्या हेतूने पाठविले. ३१ वर्षीय पूजाने २००९ मध्ये मिस इंडियाचा ताज आपल्या नावे केला आहे. त्याशिवाय ती मिस वर्ल्ड या प्रतिष्ठित स्पर्धेची सेमी फायनलिस्टदेखील राहिली आहे. २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘फॅशन’ या चित्रपटात ती स्पेशल अ‍ॅपीयरन्स म्हणून झळकली होती. २०११ मध्ये ‘पोंनर शंकर’ या तामिळ चित्रपटातून तिने डेब्यू केला, तर २०१३ मध्ये आलेल्या ‘कमांडो’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. २०१६ मध्ये ती ‘ये तो टू मच हो गया’ या चित्रपटात झळकली होती.