सत्या या चित्रपटातील या अभिनेत्याला या चित्रपटाच्या यशानंतरही मिळत नव्हते चित्रपट... आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केली खंत व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 17:19 IST
सत्या या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. या ...
सत्या या चित्रपटातील या अभिनेत्याला या चित्रपटाच्या यशानंतरही मिळत नव्हते चित्रपट... आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केली खंत व्यक्त
सत्या या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. तसेच या चित्रपटातील अनेक कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटाने बॉलिवूडला अनेक चांगले कलाकार मिळवून दिले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मनोज वाजपेयीसारख्या महान कलाकाराच्या कारकिर्दीची सुरुवात देखील याच चित्रपटापासून झाली. या चित्रपटातील कल्लू मामा ही व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात ही व्यक्तिरेखा सौरभ शुक्लाने साकारली होती. सौरभ एक प्रसिद्ध अभिनेते असण्यासोबतच प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्या सत्या या चित्रपटातील कल्लू मामा या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. कल्लू मामा ही भूमिका प्रसिद्ध झाल्यामुळे सौरभ शुक्ला यांना चित्रपटात काम करण्यासाठी खूप साऱ्या ऑफर्स येत असतील असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल. पण हे खरे नाहीये. सौरभ शुक्ला अभी तो पार्टी शूरु हुइ है या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्यांनी त्यांची ही खंत व्यक्त केली. सौरभ शुक्ला सांगतात, मला सत्या या चित्रपटानंतर प्रेक्षक कल्लू मामा या नावानेच ओळखू लागले. या चित्रपटानंतर आता मला चांगल्या भूमिका ऑफर केल्या जातील असे मला वाटत होते. पण तसे काहीच घडले नाही. मला चांगल्या भूमिकांसाठी विचारले जात नव्हते. त्यामुळे जोपर्यंत चांगली भूमिका येणार नाही, तोपर्यंत कामच करणार नाही असेच मी ठरवले होते. बर्फी या चित्रपटातील सूधांशू या भूमिकेने माझ्या करियरला कलाटणी मिळवून दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या भूमिकेसाठी मला अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यानंतर चांगल्या भूमिका माझ्याकडे स्वतःहून आल्या. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले आणि आज जॉली एलएलबी, पीके, रेड यांसारख्या चित्रपटातील माझ्या भूमिकांचे प्रेक्षक कौतुक करायला लागले आहेत. Also Read : या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार