Join us  

'तिने मला अन् सलमानला रंगेहाथ पकडलं..' अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "शेवटी कर्मच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:01 PM

सलमान खान आणि 'त्या' अभिनेत्रीला संगीता बिजलानीने पकडलेलं रंगेहाथ

बॉलिवूडचा हँडसम अभिनेता सलमान खान (Salman Khan) वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अविवाहित आहे. सलमानच्या आयुष्यात अनेक गर्लफ्रेंड्स आल्या. कित्येक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. ऐश्वर्या रायसोबत तर त्याचं अफेअर कायम चर्चेचा विषय ठरलं. याहूनही जास्त चर्चा झाली ती सलमान खान आणि संगीता बिजलानीची. भाईजान संगीता बिजलानीसोबत (Sangeeta Bijlani) लग्न करणार होता. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण असं काहितरी झालं की लग्नच मोडलं. यानंतर सलमानला संगिताने रंगेहाथ पकडलं होतं अशी अफवा पसरली. पण ही अफवा खरी निघाली आहे. स्वत: सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने तसा खुलासा केलाय. 

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांनी 1986 साली डेट करायला सुरुवात केली. मात्र 1994 साली त्यांचा ब्रेकअप झाला. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या. मात्र लग्न मोडलं. याला कारण ठरलं सलमान आणि अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) यांची जवळीक. स्वत: सोमी अलीने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या मात्र सलमानला माझ्या घरी रंगेहाथ पकडलं. तो माझ्यासोबत होता. सलमानने संगीतासोबत जे केलं तेच  माझ्यासोबतही झालं. याला म्हणतात कर्म. काही काळाने मला याची जाणीव झाली."

ती पुढे म्हणाली, "सलमानवर माझं क्रश होतं. त्याच्याशी लग्न करण्यासाठीच मी भारतात आले होते. तो मला मारायचा कारण त्याला माझी काळजी आहे असं मी एकदा म्हणाले होते. पण नंतर मला कळलं की माझं हे बोलणंही सलमानचीच चलाखी होती. शारिरीक शोषण म्हणजे त्याच्या प्रेमाचीच निशाणी आहे असं मला वाटायचं."

संगीता बिजलानी 1980 साली मिस इंडिया झाली. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून नंतर नावारुपाला आली. ८० ते ९० च्या काळात तिने 'त्रिदेव','योद्धा' सारखे हिट सिनेमे दिले. १९९६ साली तिने क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्नगाठ बांधली. मात्र २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नुकतंच संगीताने सलमान खानच्या 57 व्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांच्या रोमँटिक बाँडची खूप चर्चा झाली.

टॅग्स :सोमी अलीसलमान खानरिलेशनशिप