Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी प्रार्थना करा...! चिमुकल्या समीशासह शिल्पा शेट्टीचे अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:22 IST

 10 दिवसांत अख्ख्या कुटुंबाला कोरोनाचा विळखा; पती, मुलांसह आई, सासू-सासरे आणि स्टाफ मेंबर्सलाही झाली लागण

ठळक मुद्देतुम्ही कोव्हिड पॉझिटीव्ह असा किंवा नसा पण कृपया मास्क घाला, सॅनिटाइज करा आणि सुरक्षित राहा. सकारात्मक राहा, असे आवाहन शिल्पाने केले आहे.

कोरोना लाटेचा जोर वाढत असताना आता या व्हायरसने बॉलिवूडकरांच्या चिंताही वाढवल्या आहेत. बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा वगळता तिचा पती राज कुंदा, मुलगा विआन, मुलगी समीशा, सासू-सासरे आणि शिल्पाची आई अशा सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर आमच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती शिल्पाने चाहत्यांना केली आहे. (actress Shilpa Shetty family corona positive)शिल्पाने स्वत: पोस्टद्वारे ही माहिती दिली.

शिल्पाची पोस्ट...

गेले दहा दिवस आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण राहिलेत. माझे सासू-सासरे पॉझिटीव्ह आलेत. यानंतर समीशा, विवान आणि आईला कोरोना झाला आणि आता राजही पॉझिटीव्ह आला आहे. सगळेजण आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन सुरू आहे. आमच्या घरातील दोन स्टाफ मेंबर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझी टेस्ट निगेटीव्ह आल आहे. परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय. या कठीण काळात मदत करणा-या सर्वांचे आभार. आमच्यासाठी प्रार्थना करा..., असे शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय तुम्ही कोव्हिड पॉझिटीव्ह असा किंवा नसा पण कृपया मास्क घाला, सॅनिटाइज करा आणि सुरक्षित राहा. सकारात्मक राहा, असे आवाहनही तिने केले आहे.शिल्पा शेट्टीआधी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. यात आमिर खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, आलिया भट, आशुतोष राणा व त्याचे कुटुंब, भूमी पेडणेकर, सतीश कौशिक, मनोज वाजपेयी अशा सर्वांना समावेश आहे. गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आदींना कोरोनाने गाठले होते.

टॅग्स :शिल्पा शेट्टी