Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटीव्ह, घरातील सदस्यांचेही आले रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 10:04 IST

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांत बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाने ग्रासले आहे. अनुपम खेर यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लगण झाली आहे.

कोरोनाचा कहर वाढत असताना आता बॉलिवूडमध्येही या व्हायरसने थैमान घातले आहे. अलीकडे बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली. आता अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरापर्यंत कोरोना पोहोचलाय. साराचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. साराने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

‘मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आमचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटीव्ह आढळला. बीएमसीला याबद्दल सूचना देण्यात आली आहे. ड्रायव्हरला क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. माझे कुटुंबीय आणि माझ्या घरातील अन्य स्टाफचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तरीदेखील आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून बीएमसीचे आभार. त्यांनी आम्हाला तात्काळ मदत केली. सर्वांनी काळजी घ्या,’ असे साराने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले आहे.सारा अली खान लॉकडाऊननंतर पहिल्यांदा गेल्या 30 जूनला बाहेर पडली होती. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आॅफिसबाहेर ती दिसली होती. साराच्या चेह-यावर मास्क होता.

 सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या सिनेमात झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार व धनुष आहेत. याशिवाय तिचा व वरूण धवनचा ‘कुली नंबर 1’ हा सिनेमाही रिलीजसाठी तयार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट फायनल झालेली नाही.

गेल्या तीन दिवसांत बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाने ग्रासले आहे. अनुपम खेर यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लगण झाली आहे. कसौटी जिंदगी की 2 या मालिकेचा अभिनेता पार्थ समथान हाही कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. उंगली या चित्रपटाची अभिनेत्री रेचल व्हाइट हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. बालाजी टेलिफिल्म्सची एक्झिक्युटीव्ह व्हाइस प्रेसिडेंट तनुश्री दासगुप्ता ही सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे.  अलिकडेच अभिनेत्री रेखा यांच्या कारचालकालादेखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :सारा अली खानकोरोना वायरस बातम्या