साउथ सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री संदीपा विर्कने पंजाबी इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. तेथील दिग्दर्शक आणि अभिनेते कशाप्रकारे कामाच्या मोबदल्यात कॉम्प्रमाईजची मागतात याचा किस्सा तिने सांगितला आहे. मधल्या काळात संदीपा ६ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ४ महिने तिहार जेलमध्ये होती. काही दिवसांपूर्वीच ती जामिनावर बाहेर आली आहे. बाहेर आल्यानंतर तिने दिलेल्या मुलाखतींमध्ये अनेक खुलासे केले आहेत.
एका मुलाखतीत संदीपा विर्क म्हणाली, "एका सिनेमाच्या शूटनंतर मध्यरात्री दिग्दर्शक माझ्या रुममध्ये आला. त्यांनी दारु प्यायली होती. ते माझ्या बेडवर झोपले. मी इथे आलोय तुला कॉम्प्रमाईज करावं लागेल. ते ऐकून मी शॉक झाले. मी त्यांना म्हणाले, 'हे तुम्ही काय बोलत आहात?' ते म्हणाले, 'मी का आलोय? समजावून सांगायला तू काय लहान मुलगी नाहीयेस'.
ती पुढे म्हणाली, "नंतर मी कॉम्प्रमाईज करायला नकार दिला तर त्यांनी मला सिनेमातून बाहेर काढण्याची धमकी दिली. मी कोणत्याही अटीशर्तींवर काम करु शकत नाही. मी आधीच दिवसांचं शूट केलं होतं. तरी त्यांना मला बाहेर काढा म्हणाले. नंतर मी निर्माता आणि मुख्य अभिनेत्याकडे दिग्दर्शकाची तक्रार केली. पण सगळ्यांनीच मौन बाळगलं. निर्मात्याने तर मला कॉम्प्रमाईज करण्याचाच सल्ला दिला. अशी घटना माझ्यासोबत दुसऱ्या वेळीही झाली होती. त्यावेळी तर हिरोनेच कॉम्प्रमाईज करण्याची मागणी केली होती. फोटोशूटवेळीही त्याने गैरवर्तन केलं होतं. जोवर मागणी मान्य करत नाहीस तोवर शूट करणार नाही असं म्हणून तो अडून बसला होता. पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत."
Web Summary : Actress Sandeepa Virk disclosed that a director visited her room at midnight, demanding compromise. She faced threats of being removed from the film after refusing. Producers even suggested she comply. Similar incidents occurred with a hero during a photoshoot.
Web Summary : अभिनेत्री संदीपा विर्क ने खुलासा किया कि एक निर्देशक आधी रात को उसके कमरे में आया और समझौता करने की मांग की। इनकार करने पर उसे फिल्म से निकालने की धमकी दी गई। निर्माताओं ने भी समझौता करने की सलाह दी। फोटोशूट के दौरान हीरो ने भी ऐसी ही मांग की।