Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंसीमध्ये गरीब मुलांना भेटली अभिनेत्री समीरा रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 18:22 IST

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. ती बेबी बंप फ्लॉन्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. ती बेबी बंप फ्लॉन्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती मुंबईतील फाउंडेशनच्या मुलांना भेटताना दिसते आहे. तिने या मुलांसोबत वेळ व्यतित केला आणि त्यांचा आशीर्वादही घेतला. 

समीरा रेड्डीने या गरीब मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, माझ्या बेबी बंपला थोडासा गर्ल पॉवर मिळाली. दुपारचा वेळी मी या गोड मुलांसोबत व्यतित केला. या मुलांची एनर्जी खूप भारी आहे. या जगातील सर्वात यंग कॉन्फिडंट मुली आहेत. या इवल्याशा हातांकडून खूप आशीर्वाद मिळाला.

समीरा रेड्डीच्या मित्र व कुटुंबाने पिंक स्नोफ्लेक थीम असलेला बेबी शॉवर सेरेमनीचे आयोजन केले होते. समीराने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये समीरा खूप खूश व मस्तीच्या अंदाजात पाहायला मिळाली. तसेच तिचा मुलगादेखील खूप एक्सायडेट दिसला.

समीरा जुलैमध्ये बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या ती बॉलिवूडपासून लांब आहे. समीराने २०१४ साली व्यावसायिक अक्षय वरदेसोबत लग्न केले. २५ मे, २०१५ साली तिने एका मुलाला जन्म दिला. लग्न व मुलगा झाल्यानंतर तिने बॉलिवूडमधून रजा घेतली.

समीराने २००२ साली मैंने दिल तुझको दिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच तिने टॅक्सी नंबर ९२११ आणि रेस सारख्या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :समीरा रेड्डी