Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कल्कि २' सिनेमात दीपिका पादुकोणला या ग्लोबल स्टार अभिनेत्रीनं केलं रिप्लेस, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:53 IST

'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) च्या निर्मात्यांनी नुकतीच घोषणा केली होती की, या चित्रपटाच्या सीक्वलचा भाग दीपिका पादुकोण नसेल. आता तिच्या जागी कोण दिसणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

'कल्कि 2898 एडी'च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोणने एक्झिट घेतली आहे. यामुळे ती खूप चर्चेत आली होती. यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला आहे की, दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यामुळे हे घडले. आता या चित्रपटात दीपिकाची जागा कोण घेणार, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. लेटेस्ट रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट्सनुसार निर्माते प्रभासच्या या चित्रपटात दीपिकाच्या जागी प्रियांका चोप्राला घेण्याचा विचार करत आहेत.

दीपिकाने चित्रपट सोडल्यानंतर तिची जागा कोणती अभिनेत्री घेईल, याबाबत अनेक बातम्या आल्या. काही रिपोर्ट्समध्ये निर्माते अनुष्का शेट्टी किंवा साई पल्लवीचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले होते आणि आता, लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते आहे. आता याबाबत निर्माते कधी घोषणा करतात हे पाहावे लागेल.

नेटिझन्सच्या प्रतिक्रियायाचदरम्यान, रेडिटवर नेटिझन्सनी चर्चा सुरू केली आहे की, प्रियांका ही दीपिकाची चांगली रिप्लेसमेंट ठरू शकते की नाही. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका रेडिट युजरने कमेंट केली की, "काशीबाई शेवटी मस्तानीपेक्षा एक पाऊल पुढे गेली... खूप छान." आणखी एका युजरने लिहिले, "हा खरंच एक अपग्रेड असेल... दुसरी कोणी अभिनेत्री असती तर तो डाउनग्रेड वाटला असता." एका अन्य रेडिट युजरने कमेंटमध्ये लिहिले की, "कथेतील हा बदल ते कसा समजावून सांगणार. किमान दीपिकाच्या अनुपस्थितीला तिच्या पात्राचा मृत्यू, ती कुठेतरी हरवणे किंवा असेच काहीतरी कारण देऊन समजावता आले असते."

'कल्कि २' मधून दीपिकाची एक्झिटया वर्षी सप्टेंबरमध्ये निर्मात्यांनी ट्विट करून घोषणा केली होती, "हे अधिकृतपणे घोषित करण्यात येते की, दीपिका पादुकोण 'कल्कि 2898 एडी'च्या आगामी सीक्वलचा भाग नसेल. काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला चित्रपट बनवण्याच्या दीर्घ प्रवासादरम्यान आम्ही भागीदारी करू शकलो नाही आणि 'कल्कि 2898 एडी' सारख्या चित्रपटाला त्या कमिटमेंट आणि त्याहून अधिकची आवश्यकता आहे. आम्ही तिच्या भविष्यातील कामासाठी शुभेच्छा देतो."

'कल्कि २' कधी रिलीज होईल?'कल्कि २' चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra may replace Deepika Padukone in 'Kalki 2'.

Web Summary : Deepika Padukone exited 'Kalki 2898 AD' sequel. Reports suggest Priyanka Chopra might replace her. Deepika wanted shorter shifts. Release is expected in 2027. The makers are yet to confirm.
टॅग्स :दीपिका पादुकोणप्रियंका चोप्राप्रभास