Join us

Video: अबब! प्रियंका चोप्राच्या गळ्यात भला मोठा अजगर; पती निक जोनासची होती 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:26 IST

प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती गळ्याभोवती भला मोठा अजगर गुंडाळताना दिसत आहे

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि विशेषतः पती निक जोनासलाही धक्का बसला आहे. प्रियंकाने चक्क एका मोठ्या अजगराला आपल्या गळ्यात गुंडाळलं आहे. प्रियंका चोप्रा सध्या एका नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच शूटिंगदरम्यान प्रियंकाने एका मोठ्या सापाशी खेळण्याचा धाडसी अनुभव घेतला.

प्रियंकाने साप गुंडाळताच पती निकची रिअॅक्शन व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका एकदम मस्तीखोर अंदाजात दिसतेय. एक मोठा साप तिच्या गळ्याभोवती हळूहळू सरकत आहे. प्रियंका हसून या क्षणाचा आनंद घेत आहे. फोटोत निक मात्र काहीसा घाबरलेला दिसतो. व्हिडीओत तो म्हणतो, ''प्रिय प्रियंका, मला तुझ्या गळ्यातला नवा दागिना खूप आवडला.''. यावर प्रियंका हसून म्हणते, ''धन्यवाद, हा सर्पिन आहे.'' व्हिडीओत प्रियंका सापासोबत अजिबात न घाबरता खेळताना दिसते. तर निक मात्र काहीसा दूर असतो.

प्रियंकाचा हा खास व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तिला 'धाडसी', 'निर्भीड' म्हटलं आहे. कामाच्या ठिकाणी अशा ॲडव्हेंचरस गोष्टी करून ती चाहत्यांना सतत आश्चर्यचकित करत असते. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या काही जुन्या आठवणीही दिसतात. एकूणच सापांसोबत खेळण्याची प्रियंकाला खूप पूर्वीपासून आवड असल्याचं दिसतं. प्रियंका नुकतीच तिची लेक मालतीला सोबत घेऊन पती निक जोनासच्या म्यूझिक कॉन्सर्टला गेली होती. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती लवकरच राजामौलींच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra's daring snake encounter stuns husband, Nick Jonas.

Web Summary : Priyanka Chopra's video with a large snake around her neck went viral. Nick Jonas reacted with humor, while Priyanka appeared fearless. She is currently filming a new project.
टॅग्स :प्रियंका चोप्राप्रियांका चोप्रा आणि निक जोनासनिक जोनाससाप