‘या’ अभिनेत्री आहेत राजघराण्याच्या राजकन्या, चौथीचे नाव वाचून धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 16:40 IST
पडद्यावर आपण बºयाचदा राजघराण्यांशी संबंधित किंवा राजकुमारींच्या भूमिकेत अभिनेत्रींना बघत आलो आहोत. पडद्यावरील त्यांचा रुबाब बघून जणूकाही त्या राजकुमारी ...
‘या’ अभिनेत्री आहेत राजघराण्याच्या राजकन्या, चौथीचे नाव वाचून धक्का बसेल!
पडद्यावर आपण बºयाचदा राजघराण्यांशी संबंधित किंवा राजकुमारींच्या भूमिकेत अभिनेत्रींना बघत आलो आहोत. पडद्यावरील त्यांचा रुबाब बघून जणूकाही त्या राजकुमारी असाव्यात, असा समज झाल्याशिवाय राहत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या खरोखरच राजघराण्यांशी संबंधित आहेत. भाग्यश्रीसलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री भाग्यश्री महाराष्टÑातील एका शाही परिवाराशी संबंधित आहे. मिरजच्या शाही पटवर्धन परिवारात २३ फेब्रुवारी १९६९ रोजी भाग्यश्रीचा जन्म झाला. तिचे पूर्ण नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असे आहे. सांगलीचे राजे श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन असे तिच्या वडिलांचे नाव आहे. सोहा अली खानअभिनेत्री सोहा अली खान हिला तिच्या शाही अंदाजासाठी ओळखले जाते. आपणा सर्वांनाच माहिती आहे की, सोहा पतौडी घराण्याची लेक आहे. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर २०११ मध्ये भाऊ सैफ अली खानला पतौडी नवाब म्हणून घोषित करण्यात आले. रिया आणि रायमा सेनबंगाल इंडस्ट्रीच्या अभिनेत्री रिया आणि सायमा सेन यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे की, सेन सिस्टर्स रॉयल फॅमिलीशी संबंधित आहेत. त्यांची आजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची एकमेव मुलगी होती. किरण रावबॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव हिचे बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान आहे. पडद्यापासून जरी ती दूर असली तरी, कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असते. किरणबद्दल ही बाब फारच लोकांना माहिती आहे की, तिचे पंजोबा जे. रामेश्वर राव तेलंगनाच्या महाबूबनगरचे महाराजा होते. आदिती राव हैदरी‘मर्डर-३’ फेम आदिती राव हैदरी हीदेखील रॉयल फॅमिलीशी संबंधित आहे. आदिती एक नव्हे तर दोन राजघराण्यांशी संबंधित आहे. आदितीचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी आसामचे माजी गव्हर्नर राहिले आहेत. सोनल चौहान सोनल चौहान उत्तर प्रदेशातील मॅनपुरीच्या एका राजपूत घराण्याशी संबंधित आहे. भलेही तिचा परिवार काहीसा कंजर्व्हेटीव्ह असला तरी, तिने बॉलिवूडमध्ये एंट्री करून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.