अभिनेत्री पाओली दामला महाग पडले हनीमून! हेलिकॉप्टरने वाचवला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 14:50 IST
‘हेट स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आग लावणारी बंगाली अभिनेत्री पाओली दाम हिने गत महिन्यातच लग्न केले. ‘हेट स्टोरी’त पाओलीने ...
अभिनेत्री पाओली दामला महाग पडले हनीमून! हेलिकॉप्टरने वाचवला जीव!
‘हेट स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आग लावणारी बंगाली अभिनेत्री पाओली दाम हिने गत महिन्यातच लग्न केले. ‘हेट स्टोरी’त पाओलीने अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या त्या बोल्ड सीन्सची भलतीच चर्चा झाली होती. हीच पाओली पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी आपल्या कुठल्या बोल्ड सीनमुळे नाही तर तिच्या हनीमूनमुळे. होय, पाओलीना तिचे हनीमून चांगलेच महाग पडलेयं. आता नेमके काय झाले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण बातमी वाचावी लागेल. पाओलीने गत ४ डिसेंबरला गुवाहाटीचा हॉटेल मालक अर्जुन देबसोबत लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षे आधीपासून पाओली व अर्जुन रिलेशनशिपमध्ये होते. अखेर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर साहजिकच पाओली व अर्जुनने हनीमूनचा बेत आखला आणि हे लव्हबर्ड्स स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित डेस्टिनेशनवर हनीमूनला पोहोचले. पण रोमान्ससाठी अतिशय परफेक्ट असलेले हे डेस्टिनेशनच पाओली व अर्जुनसाठी संकट ठरले. पाओली व अर्जुन या डेस्टिनेशनवर पोहोचले आणि येथे प्रचंड हिमवृष्टी म्हणजेच स्रो फॉल सुरु झाले. दोघेही एका स्की रिजॉर्टमध्ये थांबले होते. हिमवृष्टीमुळे या रिजॉर्टचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. एकीकडे रेल्वे मार्ग, रस्ते सगळे काही बंद झाले आणि दुसरीकडे अर्जुन व पाओली दोघांच्याही तब्येती बिघडल्या. पाओलीची प्रकृती तर आणखीच बिघडली. अखेर दोघांनाही बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर बोलवावे लागले. हेलिकॉप्टरच्या मदतीने पाओली व अर्जुनला बाहेर काढले गेले. रिसॉर्टमधील अन्य दुसºया पर्यटकांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. एकंदर काय तर पाओचीचे हनीमून असे तिच्या जीवावर बेतणारे ठरले. तूर्तास पाओलीची प्रकृती धोक्याबाहेर आहे.