अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही सध्या चर्चेत आली आहे. नोराला मुंबई विमानतळावर सर्वांनी भावुक अवस्थेत पाहिलं गेलं. ती रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नोरा काळ्या कपड्यांमध्ये विमानतळावर आली होती. तिला पाहून काही चाहते जवळ आले, त्यावेळी तिच्या सुरक्षारक्षकाने एकाला दूर ढकलल्याचाही व्हिडीओ समोर आला आहे. नोराने डोळ्यांवर गॉगल लावला असून ती रडत असल्याचं सर्वांना दिसलं
नोराच्या जवळच्या व्यक्तीचं निधन?
नोराचा हा व्हिडीओ समोर यायच्या आधी अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक धार्मिक वाक्य लिहिलं होतं – "इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैही राजीऊन" या वाक्याचा अर्थ आहे, “आपण अल्लाहचेच आहोत आणि शेवटी त्याच्याकडेच परत जाणार आहोत”. त्यामुळे नोराच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नोराने याविषयी अधिकृत खुलासा केला नाही. जेव्हा विमानतळावर पापाराझींनी तिला विचारलं तेव्हा ती कोणाशीही न बोलता रडत रडत तिच्या गाडीजवळ निघून गेली. त्यामुळे सर्वांनी नोराविषयी काळजी व्यक्त केली आहे.
नोरा फतेहीकडून अद्याप या घटनेवर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र तिची पोस्ट आणि भावनिक स्थिती पाहता, तिच्या आयुष्यात काहीतरी दु:खद घडलं असावं, असाच अंदाज लावला जातो आहे. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'द रॉयल्स' या वेबसीरिजमध्ये दिसली. नोराने या सीरिजमध्ये इशान खट्टरच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. नोरा विविध डान्स शो आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स करताना दिसते