Join us

अभिनेत्री मुमताज ३५ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत कमबॅकसाठी सज्ज, पण ठेवली 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:36 IST

Actress Mumtaz :आता ३५ वर्षांनंतर, मुमताज अभिनयाच्या जगात परतण्यास सज्ज आहेत. मात्र ७७ वर्षीय अभिनेत्रीने निर्मात्यांसमोर एक मोठी अट देखील ठेवली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रींचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्यात ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज (Actress Mumtaz) यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. मुमताज यांनी त्यांच्या अप्रतिम चित्रपट कारकिर्दीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. सलग ४ दशके इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या मुमताजने १९९० मध्ये अचानक बॉलिवूडला निरोप दिला. पण आता ३५ वर्षांनंतर, मुमताज अभिनयाच्या जगात परतण्यास सज्ज आहेत. मात्र ७७ वर्षीय अभिनेत्रीने निर्मात्यांसमोर एक मोठी अट देखील ठेवली आहे. 

एकेकाळी प्रत्येक तिसऱ्या हिंदी चित्रपटात मुमताज पाहायला मिळत असत. धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि दारा सिंग यांच्यासारख्या मोठ्या बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करून मुमताज यांनी त्यांचे स्टारडम निर्माण केले होते. आता बऱ्याच काळानंतर त्या अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहेत.

ज्याबद्दल त्यांनी इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, कमबॅक करत असले तरी मी चित्रपटांमध्ये वृद्ध महिलेची भूमिका अजिबात करणार नाही आणि मला अद्याप माझ्यासारखी दिसणारी भूमिका ऑफर केलेली नाही. ज्या प्रकारची ऑफर मी शोधत आहे, मला अद्याप तशी संधी मिळालेली नाही. मला माझ्यासारखी दिसणारी भूमिका साकारायची आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे मी कोणाच्या आईची भूमिका अजिबात करणार नाही.

अभिनेत्री शेवटच्या दिसल्या या चित्रपटातमुमताज शेवटच्या १९९० मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंधियान' चित्रपटात दिसल्या होत्या. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांची एक झलक २०१० मध्ये आलेल्या '१ अ मिनिट' या माहितीपटात दिसल्या आहेत. 

टॅग्स :मुमताज