Join us
Daily Top 2Weekly Top 5

सास-यांच्या तेरवीला अभिनेत्रीचे फोटोसेशन, युजर म्हणाले, थोडी तर लाज बाळगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 12:20 IST

आघाडीची भोजपुरी अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, नुकतेच तिच्या सास-यांचे निधन झाले

ठळक मुद्देमोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 

आघाडीची भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, नुकतेच मोनालिसाच्या सास-यांचे निधन झाले. गत गुरुवारी त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ठेवला गेला. पण दु:खद प्रसंगात मोनालिसा फोटो सेशन करताना दिसली. केवळ इतकेच नाही, कॅमे-यात हसताना दिसली. शोकसभेदरम्यान मोनालिसाने आपल्या कुटुंबीयांसोबत फोटो काढला, या फोटोत मोनालिसा हसताना कैद झाली.मोनालिसाचा पती विक्रांत सिंग याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पाहताच नेटक-यांनी मोनालिसा आणि विक्रांतला ट्रोल करणे सुरु केले.

‘वाह रे सोशल मीडिया, तेरावीचेही फोटो काढता आणि ते सुद्धा हसत,’ असे एका युजरने लिहिले.   दु:ख व्यक्त करण्याची ही चांगली पद्धत आहे, असे एका युजरने उपरोधिकपणे लिहिले. तेरवीचे फोटो अपलोड करणे गरजेचे होते का? असा संतप्त सवाल एकाने केला. तर अन्य एका युजरने, किमान विक्रांतकडून ही अपेक्षा नव्हती, असे लिहित आपला संताप बोलून दाखवला. अनेकांनी मोनालिसा व तिच्या पतीला हा तेरवीचा कार्यक्रम आहे, सिनेमाचा इव्हेंट नाही, हे लक्षात आणून दिले. अनेकांनी शो आॅफ करू नका, थोडी तर लाज बाळगा असा सल्ला त्यांना दिला.

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.  तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे तिच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली .

या शोमधूनच तिला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. मोनालिसाने शोच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेन्ड विक्रांत सिंग राजपूतसोबत लग्न केले होते. अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते.   विक्रांतही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करतो.

टॅग्स :मोनालिसा