Join us

कमी वयाच्या युवकांसोबत लग्न केलेल्या अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 04:03 IST

उर्मिला मातोंडकरने आपल्या वयाहून नऊ वर्षाने लहान असणाºया काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले. आपल्या वयाहून खूप ...

उर्मिला मातोंडकरने आपल्या वयाहून नऊ वर्षाने लहान असणाºया काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले. आपल्या वयाहून खूप कमी असलेल्या तरुणासोबत लग्न करण्याच्या अभिनेत्रींचा सिलसिला जुनाच आहे. तत्पूर्वी प्रिटी झिंटानेही आपल्या वयाहून दहा वर्षाहून लहान असणाºया जीन गुडनइफशी लग्न केले. नर्गिस आणि सुनील दत्त, जरीना वहाब आणि आदित्य पांचोली यांचेही असेच उदाहरण आहे. अशा लग्न केलेल्या अभिनेत्रींची माहिती देत आहोत. उर्मिला मातोंडकर४२ वर्षीय सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपल्या वयाहून नऊ वर्षाने लहान असणाºया ३३ वर्षीय मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत गुरुवारी लग्न केले. मोहसीनचा गारमेंटचा व्यवसाय आहे.प्रिटी झिंटा४१ वर्षीय प्रिटी झिंटाने आपल्याहून दहा वर्षाने लहान असणाºया ३१ वर्षीय अमेरिकन जीन गुडनईफशी लॉस एंजल्स येथे विवाह केला. आपल्या आईमुळे आपण २०१६ साली लग्न करणार असल्याचे प्रिटीने अगोदरच जाहीर केले होते. ऐश्वर्या रॉय४२ वर्षीय ऐश्वर्या रॉयने आपल्याहून कमी वयाच्या म्हणजे ३९ वर्षीय अभिषेक बच्चनसोबत २००७ साली लग्न केले. गुरु या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. सलमान खानपासून दुरावलेल्या ऐश्वर्या रॉयने अभिषेकशी लग्न केले. या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे.शिल्पा शेट्टी४१ वर्षीय शिल्पा शेट्टीने आपल्यापेक्षा वयाने तीन महिन्यांनी लहान असलेल्या व्यावसायिक राज कुंद्रासोबत २००९ साली लग्न केले. या दोघांना वियान नावाचा मुलगा आहे. फराह खान५१ वर्षीय नृत्य दिग्दर्शिका फराह खानने आपल्या वयापेक्षा नऊ वर्षांनी लहान असणाºया शिरीष कुंदरसोबत २००४ साली लग्न केले. या दोघांना अन्या, दिव्या आणि झार ही तीन मुले आहेत.डेमी मूर४३ वर्षीय डेमी मूरने २७ वर्षीय अ‍ॅस्टन कुचरशी २००५ साली लग्न केले. २०१३ साली त्यांच्यात घटस्फोट झाला. हे कुचरचे पहिले तर डेमी मूरचे तिसरे लग्न होते.एलिझाबेथ टेलर१९९१ साली ५९ वर्षीय एलिझाबेथ टेलरने ३९ वर्षीय लॅरी फॉर्टेन्स्कीसोबत लग्न केले होते. १९९६ साली त्यांनी घटस्फोट घेतला.