Join us

या अभिनेत्रींकडे आहे स्वत:चे प्रायव्हेट जेट, अशा जगतात लॅविश लाइफ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 17:16 IST

सध्या बॉलिवूडमध्ये ‘महिलाराज’ आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्री सर्वच बाबतीत सरस ठरत आहेत. ...

सध्या बॉलिवूडमध्ये ‘महिलाराज’ आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्री सर्वच बाबतीत सरस ठरत आहेत. मग चित्रपटासाठी स्वीकारले जाणारे मानधन असो, वा आपली लॅविश लाइफस्टाइल या सर्वांमध्येच अभिनेत्री आघाडीवर असल्याचे चित्र आहे. काही अभिनेत्रींनी तर केवळ बंगला, गाडी नव्हे तर प्रायव्हेट जेटही खरेदी केले आहे. आतापर्यंत आपण अभिनेत्यांच्या प्रायव्हेट जेटविषयी जाणून होतो. मात्र आज आम्ही अभिनेत्रींच्या प्रायव्हेट जेटविषयी तुम्हाला सांगणार आहोत. प्रियांका चोप्रा बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या यशाच्या सर्वोच्च स्थानी आहे. माजी मिस वर्ल्ड असलेल्या पीसीने इंडस्ट्रीत स्वत:च्या हिमतीवर एक बळकट स्थान निर्माण केले. केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये तिच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला आहे. आज प्रियांका सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींपैकी आहे. प्रियांका अतिशय लॅविश लाइफ जगते. तिच्याकडे स्वत:चे प्र्रायव्हेट जेट असून, लांबच्या प्रवासासाठी ती त्याचा वापर करीत असते. सनी लिओनीपोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाºया सनी लिओनीने अल्पावधितच बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. सद्य:स्थितीत सनीच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. चित्रपटांमध्ये यश मिळविल्यानंतर सनी अत्यंत आलिशान आयुष्य जगत आहे. सनीकडे स्वत:चे प्रायव्हेट जेट आहे. ती नेहमीच पती आणि मुलांसोबत जेटमधून प्रवास करताना बघावयास मिळते. शिल्पा शेट्टीअभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर शिल्पाने आपल्या फिल्मी करिअरला काहीसा ब्रेक दिला. मात्र छोट्या पडद्यावर अजूनही ती कार्यरत आहे. शिल्पाकडेही स्वत:चे प्रायव्हेट जेट आहे. ती नेहमीच पती राज कुंद्रासोबत सुट्या एन्जॉय करण्यासाठी प्रायव्हेट जेटने प्रवास करीत असते. शिल्पाला तिच्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखले जाते.