‘या’ अभिनेत्रीने मुंबई बॉम्बस्फोटोतील आरोपीशी केले लग्न; त्याच्या मृत्यूनंतर झाली गायब!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 20:08 IST
६०च्या दशकात धूम उडवून देणाºया ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आसिफ यांची मुलगी हिना कौसर हिने अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्ची ...
‘या’ अभिनेत्रीने मुंबई बॉम्बस्फोटोतील आरोपीशी केले लग्न; त्याच्या मृत्यूनंतर झाली गायब!!
६०च्या दशकात धूम उडवून देणाºया ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आसिफ यांची मुलगी हिना कौसर हिने अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्ची याच्याबरोबर लग्न केले होते. हिनाची आई निगार सुल्ताना त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७० मध्ये आलेल्या ‘होली आई रे’ या चित्रपटातून हिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इंडस्ट्रीत काम केल्याच्या काही वर्षांनंतर १९९१ मध्ये हिना कौसर हिने इकबालशी मुंबईत लग्न केले होते. हिना इकबालची दुसरी पत्नी होती. इकबाल मिर्ची १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता. त्याचे खरे नाव इकबाल मेमन असे होते. मुंबईच्या नळ बाजारात त्याचे मसाल्याचे दुकान होते. त्यामुळेच त्याच्या नावासमोर मिर्ची हे नाव जोडण्यात आले होते. १९८० मध्ये त्याला ड्रग्ज तस्करीमध्ये पकडण्यात आले. येथूनच त्याच्या गुन्हेगारी जगताची सुरुवात झाली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर तो भारतातून फरार झाला. त्यानंतर हिना कौसरनेही भारतातून पळ काढला. असे म्हटले जात आहे की, हे दोघे दुबईमधून पुढे लंडनला गेले होते. हिना अखेरीस तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा २०१२ मध्ये तिने नारकोटिक्स डिपार्टमेंटने मुंबईतील इकबालचे मिर्चीचे दोन फ्लॅट सील करण्याला विरोध केला होता. यावेळी तिने न्यायालयात अपीलदेखील केले होते. मात्र न्यायालयाने तिचा अपील फेटाळून लावला. त्यानंतर तिची कुठल्याही प्रकारची बातमी समोर आली नाही. आॅगस्ट २०१३ मध्ये इकबाल मिर्चीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर हिनाची कुठलीच खबरबात समोर आली नाही. मात्र पनामा पेपर लीक प्रकरणात इकबालच्या मुलांचे आणि त्यांच्या पत्नीचे नाव समोर आले होते. मात्र यामध्ये हिनाचे नाव नव्हते. हिना कौसरने ‘पाकिजा, दोस्त, कितने पास कितने दूर, पापी, मैं तुलसी तेरे आंगन की, चोरों की बारात, धरमकाटा, रजिया सुल्तान, पांच खिलाडी, घर बाजार, आखिरी संघर्ष’ आदी चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र जेव्हापासून तिचे नाव इकबाल मिर्चीबरोबर जोडले गेले तेव्हापासून ती इंडस्ट्रीमधून दूर गेली. सध्या हिना कुठे आहे? जिवंत आहे की नाही? याविषयीची कुठलीच माहिती समोर आलेली नाही.