Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आर्यनने चांगलं काम केलं आहे, पण..."; फरीदा जलाल यांनी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल दिली स्पष्ट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:28 IST

फरीदा जलाल यांनी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिजबद्दल त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या?

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानने अभिनय सोडून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याच्या पहिल्या वेब सीरिजचे म्हणजेच 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं (The Ba***ds of Bollywood) सर्वत्र कौतुक झाले. मात्र, शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटांत काम केलेल्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी आर्यनच्या या पहिल्या कामावर आपली स्पष्ट आणि प्रामाणिक प्रतिक्रिया दिली आहे.

फरीदा जलाल यांनी आर्यनच्या या प्रवासाचे स्वागत करताना अतिशय प्रेमळ शब्द वापरले. त्या म्हणाल्या, "वेलकम होम! तो याच इंडस्ट्रीचा आहे, तर अजून कुठे जाणार? त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात येणं ही आनंददायी गोष्ट आहे."

जेव्हा फरीदा जलाल यांना आर्यनच्या दिग्दर्शनाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, "मी सीरिज पाहिली, ती ठीक होती. आर्यनने चांगले काम केले आहे, पण मला वाटते की तो यापेक्षाही अधिक चांगले काम करू शकला असता. त्याच्यात खूप क्षमता आहे आणि येणाऱ्या काळात तो नक्कीच आणखी प्रगती करेल."

फरीदा जलाल यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'कुछ कुछ होता है' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या आईची किंवा जवळच्या नातेवाईकाची भूमिका साकारली आहे. त्यामुळेच आर्यनच्या कामाबद्दल मत व्यक्त करताना त्यांनी एका घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नात्याने त्याला प्रेमाने प्रोत्साहन दिले आणि सुधारणेची संधी असल्याचेही सुचवले.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल

आर्यन खानने दिग्दर्शित केलेली 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही पहिली वेब सीरिज १८ सप्टेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. बॉलिवूडमधील आऊटसाडर कलाकारांचा संघर्ष आणि इंडस्ट्रीतील राजकारण यावर ही सीरिज भाष्य करते. या सीरिजमध्ये लक्ष्य, राघव जुयाल, मोना सिंग आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून तिला 'IMDb' ची २०२५ मधील लोकप्रिय भारतीय सीरिज म्हणून गौरवण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farida Jalal reviews Aryan Khan's directorial debut, 'The Ba***ds of Bollywood'.

Web Summary : Farida Jalal praises Aryan Khan's entry into direction but suggests improvement. She acknowledges his potential in 'The Ba***ds of Bollywood,' despite its flaws. The series explores Bollywood's outsider struggles, featuring Lakshya, Raghav Juyal, and Bobby Deol.
टॅग्स :फरिदा जलालआर्यन खानबॉलिवूडवेबसीरिजशाहरुख खान