Join us

हार्दिक पांड्याच्या रोमॅंटिक अंदाजाने ईशा क्लिन बोल्ड, दोघांचं सीक्रेट डेटिंग रंगात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 15:13 IST

काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही डेटिंग आता सिरीअर झाल्याचे समजते. दोघांनाही एकमेंकाची सोबत आवडत असून हार्दिकच्या प्रेमाने ईशा क्लिन बोल्ड झाल्याचं समजतं. 

टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री ईश गुप्ता हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही डेटिंग आता सिरीअर झाल्याचे समजते. दोघांनाही एकमेंकाची सोबत आवडत असून हार्दिकच्या प्रेमाने ईशा क्लिन बोल्ड झाल्याचं समजतं. 

DNA ने ईशाच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने एक इनसाइड स्टोरी दिली आहे. यात सूत्रांनी सांगिते की, 'ईशा हार्दिकच्या खूप प्रेमात पडली आहे. हार्दिक तिच्यासाठी ज्याही छोट्या छोट्या गोष्टी करतो त्याने ईशा फार खूश आहे'.

जर दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर असे दिसते की, अनेकदा दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतात. त्यांच्या याच गोष्टींमधून त्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसतं असं बोललं जात आहे. 

दोघांनीही आपल्या या नात्याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केलं नाहीये. सूत्रांनी सांगितले की, 'ईशा-हार्दिकला पब्लिकच्या नजरेतून दूर रहायचं आहे. त्यामुळेच ते मीडियापासून दूर राहतात. दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत'.

काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांचं ब्रेकअप झालं. दोघांमध्ये वाद झाल्यामुळे ते वेगळे झाले. त्यानंतर अशी चर्चा झाली होती की, हार्दिक अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला डेट करत आहे. पण त्यांच्या काहीच नसल्याचं उर्वशीने स्पष्ट केलं होतं.

टॅग्स :हार्दिक पांड्याईशा गुप्तासेलिब्रिटी