Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'या' अभिनेत्रीने दिला रानू मंडलला मदतीचा हात, सिनेमात गाण्याची दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 16:23 IST

सिनेमात अभिनेत्री दीपिका चिखलिया सरोजिनी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. गेल्याकाही दिवसांपासून दीपिका 'सरोजिनी' या सिनेमामुळे चर्चेतही आहे.

चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. लवकरच सरोजिनी नायडू यांच्यावरही एक बायोपिक रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका चिखलिया सरोजिनी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. गेल्याकाही दिवसांपासून दीपिका 'सरोजिनी' या सिनेमामुळे चर्चेतही आहे. विशेष म्हणजे सिनेमात रानू मंडलनेही गाणे गायले असल्याचे खुद्द दीपिकाने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 

माझा  सिनेमा सरोजिनी… राणू मंडलने धीरज मिश्रा यांनी लिहिलेली गाणी गायली आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओमध्ये रानू मंडल सांगत आहे की ती धीरज मिश्रासोबत काम करत आहे. ती सरोजिनी बायोपिकची गाणी गात आहे. मला आशा आहे की, आजवर तुम्ही मला जे प्रेम आणि आदर दिला. अगदी त्याचप्रमाणे माझ्या गाण्यालाही पसंती तुम्ही द्याल.

इंडिया टुडेशी बोलताना दीपिकाने या सिनेमाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, मला सरोजिनी नायडू यांच्या बायोपिकसाठी विचारणा झाली होती. क्षणाचाही विलंबन न लावता मी यासाठी होकार दिला. लेखन धीरज मिश्रा यांनी केले असून तेच दिग्दर्शन करणार आहेत. पण लॉकडाऊनमुळे धीरजने अजून कथा ऐकवली नाही.  जेव्हा सर्वकाही सुरळीत होईल तेव्हा आम्ही सिनेमाची तयारीला सुरूवात करणार आहोत.  

रानू मंडल पुन्हा जुने आयुष्य जगते आहे. यासाठी तिचा अहंकार तिला नडला असल्याचे बोलले जाते. रानू मंडलला कमी वेळेत लोकप्रियता मिळाली होती. मात्र अहंकारामुळे तिला ते सांभाळते आले नाही. रानूला कित्येक वेळा चाहते व मीडियासोबत गैरवर्तणूक करताना पाहिले होते. बॉलिवूडमध्ये रानू मंडलला पहिला ब्रेक दिलेल्या संगीतकार हिमेश रेशमियासोबत भांडणे केल्याचे वृत्त समोर आले होते. पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती महिला चाहतीसोबत वाईट वर्तणूक करताना दिसली होती.

Video: उद्धटपणा आला अंगाशी..! रानू मंडलला एका रात्रीत मिळाली होती लोकप्रियता, पुन्हा जगतेय गरीबीत

रानू मंडलचे गैरवर्तणूक पाहून लोकांना अजिबात आवडले नाही. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रानूला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. रानू मंडलच्या वाट्याला आलेलं हे स्टारडम टिकवता आले नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे. रानूकडे आता आगामी कोणताच प्रोजेक्ट नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉकडाउननंतर रानू पुन्हा जुन्या आयुष्यात परतली आहे आणि सध्या ती जुन्या घरात राहत आहे.

टॅग्स :राणू मंडल