Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:05 IST

आात कशी दिसतेय 'गर्व' फेम ही अभिनेत्री?

सलमान खानने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच केलं. कतरिना कैफ, स्नेहा उल्लाल, झरीन खानसह काही अभिनेत्रींचा यात समावेश आहे. यातील काही अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत तर काही मात्र इंडस्ट्रीतून गायब झाल्या आहेत. त्यापैकीच एक अभिनेत्री आहे आकांक्षा मल्होत्रा (Akanksha Malhotra). सलमानच्या सुपरहिट 'गर्व' सिनेमात आकांक्षाने त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. अनेक वर्षांनी आकांक्षा स्क्रीनवर कमबॅक करत आहे.

२० वर्ष इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर आकांक्षा मल्होत्रा कमबॅक करत आहे. आकांक्षा फिल्मी बॅकग्राऊंचीच आहे. अभिनेते-निर्माते प्रेम किशन मल्होत्रा यांची ती मुलगी आहे. तर तिचे आजोबा प्रेमनाथ मल्होत्रा आणि आजी बीना राय होते. आकांक्षाने तेलुगु सिनेमातून पदार्पण केलं होतं. नंतर तिने 'ये मोहब्बत है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एलओसी, गर्व सिनेमांमध्ये ती झळकली. मात्र तिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता आली नाही. आता २० वर्षानंतर आकांक्षा 'अनरियल' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या सीरिजं शूट सुरु असल्याची माहिती तिने दिली.

 

आकांक्षा मल्होत्रा स्वत: बिझनेसवुमन आहे. तसंच ती सोशल मीडियावरुन तिच्या कामाचे अपडेट्स देत असते. आकांक्षाचं रणबीर कपूरशी कनेक्शन आहे. आकांक्षाचे आजोबा प्रेमनाथ मल्होत्रा यांच्या बहिणीशी राज कपूर यांनी लग्न केलं होतं. त्यामुळे आकांक्षा राज कपूर यांचीही नात झाली. ऋषी कपूर यांची भाजी आणि रणबीर कपूरची ती चुलत बहीण आहे.

'गर्व' सिनेमा २००४ साली रिलीज झाला होता. यामध्ये शिल्पा शेट्टी मुख्य अभिनेत्री होती. तर सलमान खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. सिनेमाची कथा, सलमान खानचा अभिनय सगळंच प्रेक्षकांना भावलं होतं. तेव्हा सिनेमा सुपरहिट झाला होता.

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीवेबसीरिज