रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींविषयी बोलायचे झाले तर काही वर्षांमध्ये बरेच बदल बघावयास मिळाले आहेत. मग ते फीच्या बरोबरीच्या बाबतीत असो वा स्वत:च्या सोबत लैंगिक शोषणाचे प्रकरण असो, बऱ्याच अभिनेत्री खुलेआम समोर आल्या आणि या मुद्यांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अगोदर असा विचार करणेही कठीण होते की, बॉलिवूडचा एखादा चित्रपट एका अभिनेत्रीच्या दमावर चालू शकतो, मात्र विद्या बालन, कंगणा राणौत यांसारख्या बऱ्याच अभिनेत्रींनी सिद्ध करुन दाखविले की, जर चित्रपटाच्या कथेत दम असेल तर प्रेक्षक महिला प्रधान चित्रपटही पाहतात. यावर्षी बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत, कदाचित त्यांचा हा डेब्यू अविस्मरणीय ठरू शकतो.
* इसाबेल कैफनावावरुनच समजते की, इसाबेलचे नाते कॅटरिना कैफसोबत असेल. इसाबेल कॅटरिनाची लहान बहीण आहे. बऱ्याच पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंट्समध्ये कॅटरिनासोबत इसाबेलला पाहण्यात आले आहे. लवकरच इसाबेल आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीसोबत ‘टाइम टू डांस’ मध्ये या चित्रपटात दिसणार आहे. अजून या चित्रपटाची रिलीज डेट समजली नसून हा चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
* संजना संघीबॉलिवूडच्या काही चित्रपटांत संजना संघी आतापर्यंत सपोर्टिंग कलाकारच्या भूमिकेत दिसली आहे. मात्र मेन लीड अॅक्ट्रेसच्या भूमिकेत ती सुशांत सिंह राजपूतसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. संजना ‘किजी और मैनी’ या चित्रपटाद्वारा मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट ‘फॉल्ट इन आवर स्टार्स’ चा हिंदी रिमेक आहे. संजनाने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २०११ मध्ये ‘रॉकस्टार’ चित्रपटातून केली आहे. मात्र ‘किजी और मैनी’ हा तिचा लीड भूमिकेचा चित्रपट असणार आहे.
* सुरीली गौतमयामी गौतमची मोठी बहीण सुरीली गौतम यावर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुरीली पीरियड ड्रामा चित्रपट ‘बैटल ऑफ सारागढ़ी’ मध्ये रणदीप हुड्डाच्या अपोजिट असेल. सुरीली, २००८ मध्ये एका टीव्ही मालिकामध्ये दिसली आहे. त्यानंतर तिने ‘पॉवर कट’ या पंजाबी चित्रपटातून चित्रपट करिअरची सुरुवात केली. तिचा हा बॉलिवूड डेब्यू किती यशस्वी होईल हे आता आगामी काळच ठरवेल.