Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ही अभिनेत्री होती रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:45 IST

सोफिया हयात ही अभिनेत्री नेहमीच तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सोफियाने काही वर्षांपूर्वी न्यूड फोटो शूट ...

सोफिया हयात ही अभिनेत्री नेहमीच तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सोफियाने काही वर्षांपूर्वी न्यूड फोटो शूट देखील केले होते. सोफिया आणि वाद हे एक समीकरणच जमून आले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सोफियाने काही वर्षांपूर्वी ती नन होणार असल्याचे मीडियाला सांगितले होते. ती नन प्रमाणे आयुष्य देखील जगायला लागली होती. पण काहीच दिवसांत तिने तिचा हा विचार बदलला आणि आता तर ती लग्न करून तिच्या आयुष्यामध्ये सेटल झाली आहे. तिने लग्न काही महिन्यांपूर्वी धुमधडाक्यात केले असून लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.सोफिया हयातची आजवर अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत. तुम्हाला माहीत आहे का, सोफिया हयात आणि एका क्रिकेटरचे अफेअर होते आणि या अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती. रोहित आणि सोफिया यांना अनेक पार्टींमध्ये एकत्र पाहाण्यात आले होते. तसेच सोफिया आणि रोहित अनेक वेळा कॉफी शॉपमध्ये देखील दिसत असत. पण त्या दोघांनी कधीच त्यांचे अफेअर मीडियासमोर कबूल केले नाही. सोफिया आणि रोहितचे ब्रेक अप होऊन अनेक वर्षं झाली असल्याचे म्हटले जाते. पण सोफिया आणि रोहितची प्रेमकथा एका गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रोहितने नुकतेच श्रीलंकेच्या विरोधात डबल सेंच्युरी मारली. त्याच्या करियरमधील ही तिसरी डबल सेंच्युरी आहे. रोहितने श्रीलंकेच्या विरोधात ज्या दिवशी डबल सेंच्युरी मारली, त्या वर्षी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. ती मॅच पाहायला त्याची पत्नी ऋतिका सजदेह देखील आली होती. रोहितने ही सेंच्युरी पत्नीला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून दिली असल्याचे त्याने म्हटले होते. पण ही गोष्ट त्याची पूर्व प्रेयसी सोफियाला अजिबातच आवडली नसल्याचे म्हटले जात आहे. कंचनमाला पांडे ही अंध असूनही तिने ऑल्मपिक मेडल मिळवले. पण तिचे कौतुक केले जात नाही. पण रोहित केवळ पुरुष असल्याने त्याला लोकांनी डोक्यावर घेतले असे वक्तव्य नुकतेच सोफियाने केले आहे. Also Read : ​​सोफिया हयातने लांघल्या सर्व मर्यादा; शेअर केला पतीसोबतचा ‘इंटिमेट’ व्हिडिओ!