सोनू के टिटू की स्विटी मधील अभिनेता सनी सिंगचे अजय देवगणशी आहे खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 10:24 IST
नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'सोनू के टिटु की स्विटी' बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतो आ. हे ह्या चित्रपटाने आत्तापर्यंत ...
सोनू के टिटू की स्विटी मधील अभिनेता सनी सिंगचे अजय देवगणशी आहे खास नातं
नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'सोनू के टिटु की स्विटी' बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतो आ. हे ह्या चित्रपटाने आत्तापर्यंत ३१ कोटींपेक्षा जास्तचा पल्ला गाठला आहे. हा आठवडा संपेपर्यंत हा चित्रपट ४५ कोटींची कमाई करेल असा अंदाज लावला जातो आहे. हा चित्रपट केवळ २५ ते ३० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. सोनू के टीटू की स्विटी ह्या चित्रपटात तिनही कलाकारांनी सुरेख अभिनय केला आहे. कार्तिक आर्यन या आधी प्यार का पंचनामा मध्ये दिसला होता त्यात त्याने त्याची अभिनयाची चुणूक दाखवली होती. सनी सिंग ने या चित्रपटात त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसविले आहे. तर नुसरत भरुचा ने आपल्या अदाकरीने सगळयांना आनंदित केले आहे.ह्या चित्रपटातील अभिनेते सनी सिंहचा बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण बरोबर नातं आहे. कौटुंबिक नाही तर व्यावसायिक नातं आहे, सनी सिंहचे वडील हे एक स्टंट डिरेक्टर असून त्यांनी अजय देवगणबरोबर बरेचसे चित्रपट केले आहेत त्यांनी आतापर्यंत फुल और काटें, जमीन, दिलजले, अपहरण, गोलमाल ३, ऑल द बेस्ट, सिंघम, बोल बच्चन, सिंघम रिटर्न्स, हिम्मतवाला आणि शिवाय ह्या सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ALSO READ : Happy Marriage Anniversary : अजय देवगणने लग्नात काजोलसमोर ठेवली होती ‘ही’ अट! जय सिंग आणि अजय देवगण ह्याचे वडिल वीरू देवगण ह्यांची खास मैत्री आहे. वीरू देवगण आणि जय सिंग यांनी मिळून २७ चित्रपट केले आहे ज्यात गैर, दिल क्या करे, जान, दिलवाले, रूप की राणी चोरो का राजा, संग्राम, किंग अंकल, गर,संगीत,इज्जत, किशन कान्ह्या, कला बाजार सारखे चित्रपट आहेत.