Join us

शिल्पा शेट्टीला बघून वेडापिसा झाला होता हा अभिनेता; मिठीत घट्ट पकडून केले किस !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 16:56 IST

रिचर्ड यांनी अचानकच शिल्पाच्या हाताला किस केले. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु त्यानंतर मात्र जे घडले ते बघणाºयांनाही विचित्र वाटू लागले. कारण रिचर्डने शिल्पाला मिठीत घेऊन तिला किस करण्यास सुरुवात केली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बी-टाउनची सर्वांत फिट अ‍ॅण्ड फाइन अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची नजर वा कंबर बघून कितीही मोठा स्टार तिच्यावर फिदा होतो. तिच्या सौंदर्याचे कित्येकजण दिवाणे असल्याचे आपणास बघावयास मिळतात. एकदा तर व्यासपीठावरच एका विदेशी अभिनेत्याने तिला मिठीत घेऊन किस केले. ज्या पद्धतीने त्या अभिनेत्याने शिल्पाला किस केले, त्यावरून त्या अभिनेत्याला स्वत:वर कंट्रोल ठेवणे अशक्य झाले असावे, असेच दिसून आले. ही घटना २००७ मध्ये घडली होती. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात हा सर्व प्रकार जाहीरपणे घडला. एचआयव्ही जागरूकतेसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शिल्पा मंचावर उपस्थित होती. तिच्यासोबत आणखी एक व्यक्तीही व्यासपीठावर होती. दिसायला वयस्कर असलेल्या या व्यक्तीचे नाव रिचर्ड गेअर असे होते. रिचर्ड गेअर हॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्यांपैकी एक आहेत. शिल्पा कार्यक्रमादरम्यान भाषण करीत होती. यावेळी तिने रिचर्ड यांचा हाथ पकडलेला होता. काही क्षणानंतर रिचर्ड यांनी अचानकच शिल्पाच्या हाताला किस केले. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु त्यानंतर मात्र जे घडले ते बघणाºयांनाही विचित्र वाटू लागले. कारण रिचर्डने शिल्पाला मिठीत घेऊन तिला किस करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर रिचर्डने शिल्पाला मिठीत आणखी घट्ट पकडले, तसेच तिला पुन्हा किस करण्यास सुरुवात केली. व्यासपीठावर सगळ्यांसमक्ष रिचर्ड यांचा हा कारनामा अनेकांना धक्कादायक ठरला. शिल्पाला हा सर्व प्रकार धक्कादायक वाटला; तिने लगेचच यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘हे जरा जास्तच झाले’ कदाचित ही बाब रिचर्डच्याही लक्षात आली असावी. त्यांनी प्रकरण अधिक बिघडू नये म्हणून लगेचच शिल्पासमोर गुडघ्यावर बसून, डोकं खाली झुकत तिला सलाम केला. या संपूर्ण प्रकरणादरम्यान उपस्थितांमध्ये मात्र चांगलीच चलबिचल झाली होती. मीडियामध्येही शिल्पाची किस कॉन्ट्रोर्व्हसी चांगलीच चर्चेत राहिली.