Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता रितेश देशमुखचा 'केस तो बनता है', दिसणार हटके अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:25 IST

Ritesh Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख कॉमेडी रिएलिटी वेब शो 'केस तो बना है'मध्ये पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) कॉमेडी रिएलिटी वेब शो 'केस तो बना है'मध्ये वकिलाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. साप्ताहिक कॉमेडी शो, जो OTT वर प्रसारित होईल, हा भारतातील पहिला कॉमेडी कोर्ट आहे. बानिजय एशिया द्वारे निर्मित, अशा प्रकारच्या अनोख्या साप्ताहिक कॉमेडी शोमध्ये रितेश देशमुख, कुशा कपिला आणि वरुण शर्मा यांसारखे देशातील काही सर्वात आवडते सेलिब्रिटी दिसणार आहेत. २९ जुलैपासून अॅमेझॉन मिनी टीवीवर केस तो बनता हैचा प्रीमियर होईल.

केस तो बनता है या भारतातील पहिल्या कॉमेडी कोर्टात रितेश जनतेचा वकील, बॉलिवूडच्या काही मोठ्या सेलिब्रिटींवर काही विचित्र आणि विनोदी आरोप लावतील, ज्यांचा बचाव त्याचा वकील वरुण करतील. या गेस्ट सेलिब्रिटीच्या भवितव्याचा निर्णय कुशने साकारलेल्या न्यायाधीशाद्वारे केला जाईल, त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल. नवा आयाम जोडणारे साक्षीदार हे वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहेत. एंटरटेनर म्हणून रितेशची सिग्नेचर स्टाईल आणि त्याची कॉमेडीची ताकद हे प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर भुरळ घालेल.

अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की, माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची ही सर्वात प्रलंबित केस आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी किती उत्साहित आहे. हा शो म्हणजे आमच्या प्रेमाचा परिश्रम आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान वरुण, कुशा आणि माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता आणि 'केस तो बनता है' यामध्ये तुम्हाला पाहिजे ते सर्व काही आहे जसे - हसवणूक, अनेक मजेदार क्षण आणि मनोरंजनाची पातळी उच्च ठेवण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट. मला खात्री आहे की संपूर्ण भारतातील प्रेक्षक हसणे थांबवू शकणार नाहीत.

टॅग्स :रितेश देशमुख