क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यात एक वेगळचे आकर्षण आहे.. याच आकर्षणावर स्टार्स क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या नात्यांची जुनी परंपरा सुरू आहे. आजपर्यंत अनेक स्टार क्रिकेटर्सचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडले गेले. यातही अनेक अफेअर्स फक्त चवीने चघळण्यापुरतेच मर्यादीत राहिले तर काहींची अफेअर्स लग्नापर्यंत पोहोचली. आता सध्या अशाच एका क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. होय, इंडियन क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री आणि ‘एअरलिफ्ट’ची अभिनेत्री निमरत कौर यांच्यात वेगळीच खिचडी शिजत असल्याचे कळतेय. पुणे मिररने दिलेल्या वृत्तनुसार, गेल्या दोन वर्षांपासून रवी शास्त्री आणि निमरत कौर कथितरित्या एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या दोन वर्षांत दोघांनीही याची या कानाची त्या कानाला खबर होऊ दिली नव्हती. पण आता ही बातमी उघड झाली आहे. आत्तापर्यंत दोघेही सार्वजनिक जीवनात फारसे एकत्र दिसले नाहीत. अर्थात २०१५ पासून अनेकदा ही जोडी एका जर्मन कारच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली आहे. येथूनचं दोघांची लव्हस्टोरी लॉन्च झाली. रवी शास्त्री पत्नीपासून विभक्त झाले आहेत.
रवी शास्त्री अभिनेत्री निमरत कौरच्या प्रेमात? दोन वर्षांपासून करताहेत एकमेकांना डेट??
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 11:54 IST